आल्या दुर्मिळ रानभाज्या.. चविष्ट आणि हेल्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 09:14 PM2022-06-28T21:14:34+5:302022-06-28T21:15:08+5:30

Wardha News पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे.

Rare vegetables available .. tasty and healthy | आल्या दुर्मिळ रानभाज्या.. चविष्ट आणि हेल्दी 

आल्या दुर्मिळ रानभाज्या.. चविष्ट आणि हेल्दी 

googlenewsNext

 

वर्धा: पावसाळा सुरू होताच आर्वी लगतच्या ग्रामीण परिसरात वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सवच सुरू झाल्याचे भासत आहे. जंगलातील रानभाज्या नागरिकांच्या तोंडाला पाणी सोडत असून नागरिक भाजी घेण्यासाठी प्रतीक्षेत राहत असल्याचे चित्र आहे.

आर्वी लगतच्या ब्राह्मणवाडा, टाकरखेड, काकडधरा, हिवरा, चोपन, सालफळ, किन्हाळा, उमरी, दाणापूर, पाचोड, बोथली, चोरांबा, वाढोणा आदी गावांतील रानमेवा प्रसिद्ध आहे. निसर्ग संपदेने बहरलेल्या विविध आयुर्वेदिक जडीबुटी, रानमेवा व रानभाज्यांची पावसाळ्यात रेलचेल मोठ्या प्रमाणात असते.

रानभाज्यांची चव, आस्वाद घेण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात समरस व्हावे लागते. या भागातील आदिवासी व विविध जाणकर वनवासी हे जंगलाशी कायमस्वरूपी एकनिष्ठ असल्याने प्रत्येक ऋतूमधल्या इथला नैसर्गिक वातावरणाचा व बहुपयोगी औषधीयुक्त वनस्पतींचा मनमुरादपणे खवय्यांप्रमाणे आनंद उपभोगतो आहे.

पहिल्या पावसाच्या आगमनानंतर लगेच जुलै महिन्यात रानभाज्या निघायला सुरुवात होते. या काळामध्ये आर्वीतील डोंगराच्या कुशीत वसलेल्या गरीब लोकांच्या हाताला कामे नसल्याने अशा वेळी घरातील डाळ व इतर धान्य संपण्याच्या मार्गावर असते. अशा फावल्या वेळी गरीब आदिवासी बंधूंना निसर्गाची साथ मिळते.

या रानमेव्यांचा मनसोक्त आस्वाद

जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर ऑगस्टपर्यमत रानभाज्यांची रेलचेल असते. कटुले, तरोटा, वाॅसन, आरा, डोडा, बाना, गालंगा, काटा, चेरवाई, कटुलिच, करंज्या, पिठपापडा आदी रानभाज्यांचा नागरिक मनसोक्त आस्वाद घेतात. रानभाज्या औषधीयुक्त असल्याने शहरी लोकांनी जादा दोन पैसे खर्च करून या रानमेव्यावर ताव मारावा, अशी ग्रामीण भागातील आदिवासी व जंगलातील नागरिकांची भावना आहे.

रानभाज्या पोषक आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तरोटा, कटुले या मोसमात सेवन केल्याने शरीराला जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे आर्वीच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा आर्वीच्या जनतेने आस्वाद घ्यावा.

अविनाश टाके

सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांना जीवनसत्त्वयुक्त भाज्या खायला मिळत नाहीत, त्यामुळे व्यक्तीचा शारीरिक व मानसिक विकास खुंटतो. परंतु लोकांनी आर्वीच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रानमेव्याचा वापर आपल्या जेवणात केल्यास शारीरिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. म्हणून प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षारयुक्त असलेल्या भाज्या आहारात समाविष्ट करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे.

उमेश आसटकर

Web Title: Rare vegetables available .. tasty and healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.