शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कोविड-१९ ची ‘रॅपिड प्रोग्रेशन स्टेज’ धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तसेच विविध प्रकारचे दुखणे अंगावर काढल्याने रुग्ण कोरोनाच्या वेगवान प्रगतीच्या टप्प्यात पोहोचण्यास कारणीभूत ठरतो. कोरोना संक्रमणाच्या याच पायरीला ‘रॅपिड प्रोग्रेशन स्टेज’ म्हटले जाते. या स्टेजवर पोहोचलेले काही रुग्ण सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचारही घेत आहेत. शिवाय त्यांना वेळीच तंदुरूस्त करण्यासाठी कोविड रुग्णालयातील डॉक्टरही प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देसावधान। सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. इतकेच नव्हे तर कोरोना संसर्गाबाबत अनेक गैरसमज अजूनही नागरिकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे अनेक व्यक्ती लक्षणे असतानाही दुखणे अंगावर काढत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोविडची ‘रॅपिड प्रोग्रेस स्टेज’ कोरोना बाधित रुग्णांसाठी धोक्याची ठरू पाहत असल्याने नागरिकांनीही सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास वेळीच नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तसेच विविध प्रकारचे दुखणे अंगावर काढल्याने रुग्ण कोरोनाच्या वेगवान प्रगतीच्या टप्प्यात पोहोचण्यास कारणीभूत ठरतो. कोरोना संक्रमणाच्या याच पायरीला ‘रॅपिड प्रोग्रेशन स्टेज’ म्हटले जाते. या स्टेजवर पोहोचलेले काही रुग्ण सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचारही घेत आहेत. शिवाय त्यांना वेळीच तंदुरूस्त करण्यासाठी कोविड रुग्णालयातील डॉक्टरही प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी या स्टेजवर रुग्ण गेल्यावर कोविडनंतरच्या सहविकृती आणि बाधितांचा मृत्यू रोखण्याचे मोठे आव्हाण वैद्यकीय तज्ज्ञांसमोर उभे राहते.त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे असा कुठलाही प्रकार नागरिकांनी अंगावर काढू नये. तसेच लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कोविड चाचणी करून घेत औषधोपचार घ्यावा, असे सांगण्यात आले.ऑक्सिजनचे प्रमाण असते ८८ पेक्षा कमीबाधित रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ८८ पेक्षा कमी असते तेव्हा कोरोनाची रॅपिड प्रोग्रेशन स्टेज असल्याचे म्हणता येत असून रुग्णांनी लक्षणे असताना तीन ते सात दिवस दुखणे अंगावर काढल्याने त्यांच्या फुफ्फुसातील संसर्ग अधिक वाढलेला असतो. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्याला लपवून न ठेवता रुग्णाने वेळीच नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून उपचार घेतले पाहिजे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या