शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जिल्ह्यात १६.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:47 PM

खरीप हंगामातील मुख्य आणि नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर यंदा बोडअळीचे संकट आले. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे.

ठळक मुद्देसीसीआयला १२०० क्विंटल कापूस : फेडरेशनचे नऊ केंद्र मुहूर्ताविनाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामातील मुख्य आणि नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसावर यंदा बोडअळीचे संकट आले. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल १६.७२ लाख क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्याच घशात गेला असून सीसीआयला केवळ १२०० क्विंटल कापूस खरेदी करता आला आहे.पावसाच्या कमी-अधिक प्रमाणाचा सोयाबीनवर विपरित परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीवर भर दिला. जिल्ह्यात कपाशीची सर्वाधिक लागवड करण्यात आली. पेरा वाढल्याने तथा बऱ्यापैकी पाऊस झाल्याने यंदा कपाशीचे पीक भरघोस येईल, अशी अपेक्षा होती; पण बीटी बियाण्यांवर बोंडअळीने हल्ला केला. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचा कापूस एक-दोन वेच्यातच संपला. काही शेतकऱ्यांना शेतात नांगर चालवावा लागला. अनेक भागांतील शेती आजही पांढरी दिसून येते; पण अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे कापूस चिकट आला आहे. तो वेचण्यास जड असल्याने मजूरही मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. आता तर मजुरांची मजुरी वाढल्याने कापूस वेचावा की नको, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल असून शेती मात्र पांढरी झाल्याचे दिसून येत आहे.या स्थितीतही बाजारपेठेत कापसाची आवक मात्र बऱ्यापैकी झाल्याचे दिसून येते. वर्धा जिल्ह्यात आजपर्यंत १६ लाख ७३ हजार ४७५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यातील केवळ ११९७ क्विंटल कापूस सीसीआयद्वारे खरेदी करण्यात आला आहे. उर्वरित १६ लाख ७२ हजार २७६ क्विंटल कापूस बाजार समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. यंदा शेतकऱ्यांना ४८०० ते ५३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; पण अद्यापही भाववाढ न झाल्याने तथा आर्थिक हतबलता लक्षात घेत शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असल्याची स्थिती आहे.सीसीआयच्या चार केंद्रांवर खरेदी शून्यवर्धा जिल्ह्यात सीसीआयकडून सेलू, सिंदी (रेल्वे), हिंगणघाट, देवळी, कांढळी आणि वायगाव येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते; पण यातील केवळ दोनच केंद्रांवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणला. उर्वरित चार केंद्रांमध्ये खरेदीचा मुहूर्तही साधता आलेला नाही. सेलू केंद्रावर १ हजार ६७ क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे केवळ १३५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयकडून ठरलेला ५०५० एवढाच भाव मिळत असल्याने आणि व्यापारी रोखीने चुकारे तथा अधिक भाव देत असल्याने शेतकऱ्यांचा कलही व्यापाºयांना कापूस विकण्याकडेच असल्याचे दिसून येते.५३ व्यापाऱ्यांनी खरेदी केला कापूसकृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ५३ खरेदीदार संस्था, व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला आहे. यात आर्वी, आष्टी, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर बाजार समिती अंतर्गत येणाºया व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ४८०० ते ५३०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.