शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भौगोलिक सुविधा असतानाही सहा दशकांपासून पुलगाव उपेक्षित

By admin | Updated: May 31, 2014 23:40 IST

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे व कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुलगाव शहर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने पाहिजे तशी ठोस पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध

प्रभाकर शहाकार - पुलगावजिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे व कामगारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुलगाव शहर व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने पाहिजे तशी ठोस पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे सर्व भौगोलिक सुविधा उपलब्ध असतानाही मागील सहा दशकात हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. नव्या नेत्यांकडून तरी या शहराच्या विकासाकरिता कार्य केले जात काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा परिसर म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला; परंतु गत कित्येक वर्षांपासून या क्षेत्रातील राजकारण म्हणजे राजकीय आखाडा झाला. या आखाड्यातील राजकीय नेत्यांच्या कुस्त्या पाहून टाळ्या वाजविण्याच्या पलिकडे या क्षेत्रातील कार्यकर्ते व मतदारही काहीच करू शकले नाही. या राजकीय कुस्त्याच्या राजकारणात शहर व परिसराकडे सार्‍यांचेच दुर्लक्ष झाले. राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या क्षेत्राने दिले आहे. आमदार, खासदार नव्हे तर सत्तेत सहभागी असणारे मंत्रीही दिले; परंतु शहराच्या विकासाकडे मात्र सर्वच जनप्रतिनिधींनी पाठ फिरविली. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीत १८८९ साली पुलगाव कॉटन मिल व १९४२ साली स्थापन झालेला केंद्रीय दारूगोळा भंडार जर सोडले तर या भागात सहा दशकात कुठलाही दुसरा मोठा उद्योग येऊ  शकला नाही.मुंबई-कलकत्ता या रेल्वे मार्गावर असणारे कवठा हे गाव इंग्रज राजवटीत जिल्ह्याचे मुख्यालय होते. या गावालगतच बारामाही वाहणारी वरदा (वर्धा) नदी आहे. परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहून इंग्रज शासनाने १८६५ साली या नदीवर रेल्वे पुलांची निर्मिती करीत या गावाला ‘ब्रीज टाऊन’ पुलगाव हे नाव दिले.पुढे येथील भोगोलिक परिस्थिती व दळणवळणाची व्यवस्था पाहून १८८९ साली नागपूरच्या बुटी परिवारानी येथे कापड गिरणी सुरू करून विकासाची मुहूर्तपेठ केली. पुढे हा उद्योग भरभराटीस येऊन ३५00 कामगारांना रोजगार मिळाला व गावाचे शहरात रूपांतर झाले. तेव्हापासून शहर आहे त्याच स्थितीत आहे. या शहराचे महत्त्व व उपलब्ध असलेली भौगोलिक परिस्थिती इंग्रजांना कळली व त्यांनी १९४२ साली या शहरात संरक्षण विभागाचा देशातील सर्वात मोठय़ा दारूगोळा भांडाराची स्थापना केली. यातून शहराच्या विकासाला काही प्रमाणात दिशी मिळाली. शहराचा विकास व्हावा म्हणून पुलगाव ते आर्वी           नॅरोगेज रेल्वे सुरू केली. आज या शहरातून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ मार्ग सुरू असताना ही पुलगाव कॉटन मील हा मोठा उद्योग, पुलगाव-आर्वी रेल्वे मार्ग बंद करण्यात आला.या शहरालगत असलेल्या विशाल जागेवर औद्योगिक वसाहत स्थापन व्हावी असा प्रयत्नही करण्यात आला; परंतु नेत्यांच्या उदासीन धोरणामुळे हेही होऊ शकले नाही. म्हणून की काय? नुकत्याच आलेल्या सत्ता परिवर्तनाच्या लाटेतून एखादा भगिरथ निर्माण होऊन या शहराच्या विकास करील, या प्रतीक्षेत शहर व परिसरातील सर्वसामान्य आहेत.