शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

सार्वजनिक स्थळ आणि शासकीय कार्यालयातील पिचकाऱ्या कायमच

By admin | Published: January 11, 2017 12:59 AM

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायद्याने अपराध आहे. याकरिता दंडात्मक कार्यवाहीचे प्रावधान असले

कायदा बासनात : कारवाईकरिता तक्रारच नसल्याची सबब वर्धा : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायद्याने अपराध आहे. याकरिता दंडात्मक कार्यवाहीचे प्रावधान असले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो कागदावरच असल्याचे दिसून आले आहे. हा कायदा कडक करून त्यात दंडाची रक्कम वाढविली तरी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषत: शासकीय कार्यालयात उडणाऱ्या पिचकाऱ्यांवर याचा कुठलाही परिणाम झाला नसून त्या कायमच असल्याचे दिसत आहे. हा कायदा असताना हिंगणघाट येथील राज्य परिवहन विभागाच्या बसस्थानकावर एसटी बसची वेळ दाखविणारा फलक नागरिकांकसह परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी उडविलेल्या खर्ऱ्याच्या पिचकाऱ्यांत हरविला होता. येथील पर्यावरण संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोहिमेद्वारे स्वच्छ केला. मात्र बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी येत थुंकणाऱ्यांवर कुठलीही कार्यवाही बसस्थानक परिसरात झाल्याचे ऐकिवात नाही. येथेच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात अशी कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. शासकीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी सुशिक्षित असताना त्यांना इथे थुंकू नये असे फलक लावण्याची वेळ येते यापेक्षा दुसरे दुर्भाग्य कोणते, असे बोलले जाते. जेथे फलक लावण्यात येते तिथेच थूंकण्यात येते. शासकीय कार्यालयात गेले असता कार्यालयातील एक ना एक कोपरा लाल रंगाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला दिसल्याशिवाय राहत नाही. शासकीय कार्यालयातच या कायद्याचे उलंघण होत आहे. एवढेच नाही तर या कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे अधिकार ज्यांना आहे त्यांच्याकडूनही त्याचे उलंघण होत असल्याचे समोर आले आहे. केवळ सार्वजनिक ठिकाणी थुंकणेच नाही तर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपिकरण कायद्याचाही अंमल जिल्ह्यात नसल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात पोलिसांकडे कुठलीही तक्रार झाली नसल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे कायदे करूनही त्यावर अंमल होत नसल्याचे दिसून आले आहे. या कायद्यांसंदर्भात नव्याने जनजागृती अभियाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी) हिंगणघाट येथील बसस्थानकावर पर्यावरण संरक्षण संस्थेने केला वेळापत्रकाचा फलक स्वच्छ हिंगणघाट - शहरात येणारा नवखा माणूस पहिले बसस्थानकावरच येतो. यामुळे आपल्या शहराची एक चांगली ओळख निर्माण होण्याकरिता निदान बसस्थानक तरी स्वच्छ असावे, या उद्देशाने पर्यावरण संरक्षण संस्थेच्यावतीने प्रत्येक रविवारी अशी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे येथे येणाऱ्या नागरिकांत आता स्वच्छतेबाबत जागृती निर्माण झाल्याचे दिसत आहे. कचरा हा केवळ कचरा कुंडीत टाकण्यात येतो. ही मोहीम काही प्रमाणात सार्थकी ठरत असल्याचे संस्थेचे अभिजित डाखोरे यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गतच बसस्थानकावरील अस्वच्छ दिसणारा वेळापत्रकाचा फलक स्वच्छ करण्यात आला. मोहिमेला आशिष भोयर, अभिजित डाखोरे, ज्ञानेश चौधरी, रमेश झाडे, प्रदीप गिरडे, छत्रपती भोयर, सचीन थूल व योगेश तपासे आणि सहकाऱ्यांनी हातभार लावला.(तालुका प्रतिनिधी)