शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा शहर स्वच्छतेसाठी २५ टक्के निधीची तरतूद

By admin | Updated: March 1, 2017 00:50 IST

येथील नगर परिषदेची विशेष अर्थसंकल्पीय सभा पालिकेच्या सभागृहात मंगळवारी पार पडली.

नव्या चमूचा पहिला अर्थसंकल्प : पालिकेचे ७८.४४ कोटींचे नियोजन वर्धा : येथील नगर परिषदेची विशेष अर्थसंकल्पीय सभा पालिकेच्या सभागृहात मंगळवारी पार पडली. यात ७८ कोटी ४४ लाख ६९ हजार ३०७ रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात २५ टक्के रक्कम स्वच्छता अभियानाकरिता राखीव असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षाअखेर सर्व उत्पन्न व खर्च वजा जाता ३९ लाख ३४ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. पालिकेत सत्तांतरण झाल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असल्याने याकडे वर्धेकरांचे विशेष लक्ष लागले होते. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा अर्थसंकल्प पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सादर केला. यावेळी उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, सर्वच विषय समित्यांचे सभापती तथा सर्वच सदस्यांची उपस्थिती होती. या संकल्पाला सभागृहात उपस्थित सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात भारत स्वच्छता व अभियानाकरिता एकूण बजेटच्या २५ टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. यात एकूण महसूली उत्पन्न ४२ कोटी ९२ लाख २० हजार रुपये दर्शविण्यात आले आहे. तर भांडवली उत्पन्न २० कोटी ३० लाख ७० हजार रुपये दर्शविले आहे. या दोन्ही प्रस्तावित उत्पन्नातून यंदाचा खर्च करण्यात येणार आहे. यात महसुली खर्च ३८ कोटी १९ लाख ८५ हजार तर भांडवली खर्च २९ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दर्शविण्यात आला आहे. या खर्चानंतर ३९ लाख ३४ हजार ३०७ रुपये शिल्लक राहणार असल्याचे अर्थसंकल्प दर्शवित आहे. पालिकेच्या सर्वप्रकारच्या अस्थापना खर्चावर २३ कोटी ४७ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च आहे. कार्यालयीन खर्चावर १ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र कचरा पसरला आहे. या घनकचरा व्यवस्थापनाकरिता ५ कोटी, नाला सफाई २५ लाख, कचरा उचलने ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. पाणी पुरवठ्याकरिता ५० लाख, पाईपलाईन देखभाल दुरूस्तीकरिता ३० लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. दिवाबत्तीकरिता २५ लाख तर पथदिव्यांच्या देयकापोटी १ कोटी रुपये प्रस्तावित आहे. प्राथमिक शाळा दुरूस्तीकरिता एकूण अर्थसंकल्पातील १ टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. शिक्षण विभागाकरिता ७० लक्ष रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे.(प्रतिनिधी)