क्रीडा संकुलाकरिता जागा दिल्यास निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:25+5:30

कारंजा नगरपंचायतच्यावतीने कस्तुरबा विद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अमर काळे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर, नगपंचायत अध्यक्ष कल्पना मस्के, उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर, आष्टी नगरपंचायतच्या अध्यक्ष जयश्री मुकरदम व नगरपंचायत मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची उपस्थिती होती.

Provides space for sports complexes | क्रीडा संकुलाकरिता जागा दिल्यास निधी देणार

क्रीडा संकुलाकरिता जागा दिल्यास निधी देणार

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : देशाच्या विकासात गावातील युवकांचे मोठे योगदान राहिले आहे. या युवकांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडांगणे व सांस्कृतिक भवनाची आवश्यकता असते. नगरपंचायतीने या गावामध्ये क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास जिल्हा नियोजन समितीतून महिन्याभरात निधी उपलब्ध करुन देणार, अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास व व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिली.
कारंजा नगरपंचायतच्यावतीने कस्तुरबा विद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अमर काळे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर, नगपंचायत अध्यक्ष कल्पना मस्के, उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर, आष्टी नगरपंचायतच्या अध्यक्ष जयश्री मुकरदम व नगरपंचायत मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री सुनील केदार म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करावा परंतु, त्याच्या अधीन जाऊ नये. युवक ही देशाची शक्ती असल्याने गावाच्या विकासाला त्यांनी हातभार लावावा. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातच जन्माला आल्याने ग्रामीण भागाच्या विकासासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. आताही कारंजा या गावातील पाण्यासह इतर समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार, असे आश्वासन देऊन क्रीडा संकुलाची जागा निश्चित करुन ३१ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. कित्येक वषार्पासून अस्तित्वात असलेल्या नगरपालिकेपेक्षा नव्याने अस्तित्वास आलेल्या कारंजा नगरपंचायतने अल्पावधीतच विकासात्मक पाऊल उचलत गावाचा चेहरामोहरा बदलला. त्याकरिता महाविकास आघाडी सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील.राजकारण विसरुन विकास कामात हातभार लावला तर निश्चित त्याचे चांगले परिणाम दिसून येतात असा विश्वास माजी खासदार अनंत गुढे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार अमर काळे, नगरपंचायतचे उपाध्यक्ष नितीन दर्यापुरकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये ‘ब’ वर्ग नगरपालिका गटातून कारंजा नगरपंचातीने जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकाविला. त्याकरिता उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शहरातील सामाजिक संस्था, पत्रकार, डॉक्टर असोसिएशन, व्यापारी संघटना तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रेम महिले यांनी केले. कार्यक्रमाला नगरपंचायतचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सदस्यगण तसेच गावातील नागरिक व तरुण मंडळी उपस्थित होते.

महोत्सवात बक्षिसांची लयलूट
या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवात ‘अ’ गटात १२ संघ सहभागी झाले होते. यामध्ये आर्वी येथील तपस्या स्कूलच्या संघाने पहिला क्रमांक पटकाविला. तर कारंजा येथील ए.आर.सी. पब्लिक स्कूलने व्दितीय व आष्टीच्या महात्मा गांधी प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला. ‘ब’ गटामध्ये कारंजा येथील सनशाईन स्कूल, नारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व राजु गांधी मेमोरियल स्कूल कारंजा यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. खुल्या गटामध्ये अत्केमी डान्स ग्रुर नागपूर यांना प्रथम, डी.वन.डान्स ग्रुप, नागपूर यांना द्वितीय तर तृतीय क्रमांक एफ.डी.ए.डान्स गु्रप नागपूर व ए.डी.फाईव डान्स ग्रुप नागपूर या दोघांना देण्यात आला.

Web Title: Provides space for sports complexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.