शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीपेक्षा दिवसा वीजपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, या आशेवर रबीची पेरणीपूर्व मशागत करून नव्या जोमाने कामाला लागला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जीवावर उदार होऊन करावे लागतेच ओलित

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : वीज महावितरण कंपनीच्या वतीने आठवड्यातून तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे पिकांना ओलित करणे अवघड झाले आहे. रात्री जीवावर उदार होऊनच ओलित करावे लागत आहे. दिवसाच वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर मोडलेला शेतकरी उसनवारी आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत रबीच्या हंगामाकडे वळला आहे. खरिपाची तूट रबीमध्ये भरून निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, या आशेवर रबीची पेरणीपूर्व मशागत करून नव्या जोमाने कामाला लागला आहे. मात्र आठवड्यातून तीन दिवस दिवस वीजपुरवठा आणि आठवड्यातून चार दिवस रात्री वीजपुरवठा केला जात असून दिवसभर शेतात राबायचे आणि रात्री पुन्हा शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जायचे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकऱ्यांचा कुणीच कैवारी नाही, अशी भावना तो व्यक्त करीत आहे.नव्याने आलेल्या सरकारकडून परिसरातील शेतकऱ्यांना आता तरी दिवसा वीजपुरवठा मिळेल, ही आस लागली असून निदान रात्रीला तरी शांतपणे झोप घेऊ, या आशेवर बळीराजा बसला आहे.रबी हंगामातील पिकांची लागवड सुरू असून दिवसभर शेतात काम करायचे आणि रात्री १० नंतर पुन्हा शेतात जाऊन पिकांना पाणी द्यायचे. यामुळे शेतकरी यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत असून महावितरण कंपनीने दिवसभर वीजपुरवठा करावा; जेणेकरून शेतकºयांची हेळसांड होणार नाही- अशोक सुपारे, माजी पं. स. सदस्य, अल्लीपूर.शेतकºयाला संपूर्न जगाचा पोशिंदा म्हटले जाते, पण या पोशिंद्याचीच शासन, प्रशासन हेडसांड करते. एवढ्या थंडीत पिकांना पाणी द्यायला जावे लागते. एकटे शेतात रात्री काम करणे जीवावर बेतू शकते याकडे लोकप्रतिनिनी लक्ष द्यावे.- पांडुरंग ढगे, शेतकरी अल्लीपुर.

टॅग्स :electricityवीज