शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांनी गाठला तळ; दोन कोरडे

By admin | Updated: April 21, 2016 02:23 IST

राज्यात सर्वत्र पाणीटंचाईचे काहुर माजले असताना जिल्ह्यातही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.

तीन धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा : धाममध्ये पिण्याकरिता दोन महिने पुरेल एवढे पाणीवर्धा : राज्यात सर्वत्र पाणीटंचाईचे काहुर माजले असताना जिल्ह्यातही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र आहे. सरसकट भयावह स्थिती दिसत नसली तरी जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला आहे. १५ पैकी दोन प्रकल्प तर कोरडे पडले असून तीन प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. वर्धा शहरासह तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पामध्ये सध्या ११.५७ दलघमी जलसाठा आहे. या धरणातील पाणी पिण्याकरिता राखीव असून दोन महिन्यांपर्यंत नागरिकांची तहान भागविली जाऊ शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.वर्धा जिल्ह्यात १५ मोठे व मध्यम प्रकल्प आहेत. या धरणांतून सिंचन, उद्योग आणि पिण्याकरिता जलसाठा राखीव केला जातो. उन्हाळ्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून जलसंचय केला जातो; पण दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने संचित जलसाठाही अपूरा ठरताना दिसतो. जिल्ह्यातील १५ प्रकल्पांपैकी पोथरा आणि पंचधारा प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत. गतवर्षी २० एप्रिलपर्यंत या दोन्ही धरणांमध्ये सरासरी १.६० दलघमी जलसाठा शिल्लक होता. शिवाय डोंगरगाव, मदन आणि मदन उन्नई या तीन धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा राहिला आहे. वर्धा शहर आणि तालुक्यातील गावांना तसेच धाम नदी काठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पामध्येही दोन महिने पुरविता येईल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. धाम प्रकल्पामध्ये ११.५७ दशलक्ष घनमीटर म्हणजे १९.४५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांमध्येही उपयुक्त जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. यामुळे कारंजा (घा.), आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यातील काही गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विहिरींनीही तळ गाठल्याने अनियमित पाणी पुरवठा होताना दिसतो. शिवाय अन्य सार्वजनिक विहिरी व हातपंपांची भूजल पातळी खालावली आहे. वर्धा तालुक्यातील सेवाग्राम, आर्वी तालुक्यातील रसुलाबाद, समुद्रपूर व पुलगाव शहरातील काही भाग, हिंगणघाट तालुक्यातील धोची, कारंजा तालुक्यातील मोर्शी यासह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)