शेतकरी संवाद यात्रेने जाणून घेतल्या नऊ गावांतील समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:38 IST2017-09-18T00:37:46+5:302017-09-18T00:38:01+5:30
शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या.

शेतकरी संवाद यात्रेने जाणून घेतल्या नऊ गावांतील समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : शेतकरी संवाद यात्रेने शनिवारी तालुक्यातील नऊ गावांना भेटी देत ग्रामस्थ तथा शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. संवाद यात्रेत शेतकºयांनी सहभाग घेत समस्या मांडल्या. वन्यप्राण्यांमुळे पिकाचे नुकसान, शेतात सिंगल फेज वीज पुरवठा, गावपांदण रस्त्याची दुरूस्ती, शेतमालाला योग्यभाव, अनियमित वीज पुरवठा व सिंचनाच्या अपुºया सुविधा या समस्यांचा समावेश होता. याबाबत लेखी निवेदने स्वीकारून शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची हमी संवाद यात्रेचे प्रमुख आयोजक अभिजीत फाळके यांनी दिली.
भूमिपुत्र संघर्ष वाहिनी पुणे, आपुलकी सामाजिक संस्था पुणे, श्री संत गाडगेबाबा चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई, किसानपुत्र सामाजिक संस्था, अनिल गावंडे मित्रपरिवार आणि टिचवन या सहा सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचा शुभारंभ ९ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा येथून झाला. मॉ जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा निघाली. अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती व वर्र्धा या पाच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ६० गावांना भेटी देत ग्रामस्थ व शेतकºयांच्या समस्या जाणून घेत शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, हा यात्रेच्या आयोजनामागील हेतू होता. प्रत्येक गावात जाऊन शेतकºयांसोबत बसून समस्या जाणून घेतल्या. यात्रे दरम्यान गावांत हारतुरे न स्वीकारता, लाऊड स्पीकरचा वापर न करता, बॅनर वा पोस्टर न लावता तथा भाषणबाजी न करता शेतकºयांची थेट चर्चा केली. यात लेखी समस्या जाणून घेतल्या.
कारंजा तालुक्यात संवाद यात्रेने शनिवारी जंगलाला लागून असलेल्या माळेगाव (काळी), नरसिंगपूर, उमरी, ब्राह्मणवाडा, ठाणेगाव या गावांना भेटी दिल्या. सभोवतालच्या गावांतील समस्याही जाणून घेण्यात आल्या. सरपंच, गावस्तरीय कार्यकर्ते, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेसोबत आपूलकी व भूमीपूत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके, संत गाडगेबाबा संस्थानचे प्रशांत देशमुख, योगेश देशमुख, अनिल गावंडे, संतोष अडसर, गजानन बोरोकार, सागर देशमुख, मिथून मोंढे, निखिल जैत, विजय घाळाय, प्रदीप बिल्लोरे, तसेच वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्ते सचिन घोडे, प्रशांत देशमुख, सागर बरडे, नंदू गावंडे, संदीप शेळके, राजाभाऊ पालीवाल, प्रा. अरुण फाळके, भाऊराव धोटे, भांगे, कामटकर, पांडे, भक्ते, जोरे, अवथळे, नासरे, देवासे उपस्थित होते. त्यांनी शेतकºयांसोबत संवाद साधून निवेदने स्वीकारली. उच्च शिक्षित नोकरी असलेले युवक शेतकºयांपर्यंत पोहोचल्याने हवालदिल शेतकºयांना दिलासा मिळाला.
या समस्यांचा होणार पाठपुरावा
तालुक्यात एखादे मोठे धरण व्हावे, पाझर तलावांची खोली वाढवावी, दुरूस्ती करावी, खैरी धरणाची पाणी साठवणूक व सिंचन क्षमतेसाठी धरणाची उंची वाढवावी, मोर्शी, खरसखांडा, नरसिंगपूर, बोंदरठाणा येथे नवीन तलावांची निर्मिती करावी, प्रत्येक गावातील पांदण रस्ते दुरूस्त करावे, शेतात सिंगल फेज वीज द्यावी, विद्युत पुरवठा १२ तास द्यावा, ब्राह्मणवाडा, माळेगाव, नरसिंगपूर या गावात पशुवैद्यकीय केंद्र सुरू करावे, हेटीकुंडी पशुपैदास केंद्राचे पुनरूज्जीवन करावे, उमरीचा शिकस्त झालेला पाझर तलाव दुरूस्त करावा, आदी समस्यांचा शासनाकडे पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असा निर्धार संवाद यात्रेमार्फत व्यक्त करण्यात आला.