गांधी जयंतीनिमित्त जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:18+5:30
महात्मा गांधींच्या आश्रमात परंपरागत गांधी जयंती साजरी होणार आहे. आश्रमात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मोठ्या संख्येने नागरिक येतात. यासाठी आश्रमही सज्ज झाला असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. पावसाळा ओसरला की गांधी जयंती येते. सर्व स्मारके माती, लाकूड, बोरे, बांबू आदींपासून बनविण्यात आलेली आहे. परिसर प्रकारच्या फुलझाडांनी नटलेला आहे. संपूर्ण परिसरात बद्री अंथरलेली आहे.

गांधी जयंतीनिमित्त जय्यत तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : महात्मा गांधींच्या आश्रमात परंपरागत गांधी जयंती साजरी होणार आहे. आश्रमात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मोठ्या संख्येने नागरिक येतात. यासाठी आश्रमही सज्ज झाला असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत.
पावसाळा ओसरला की गांधी जयंती येते. सर्व स्मारके माती, लाकूड, बोरे, बांबू आदींपासून बनविण्यात आलेली आहे. परिसर प्रकारच्या फुलझाडांनी नटलेला आहे. संपूर्ण परिसरात बद्री अंथरलेली आहे.
मातीची लिपाई, सारवण, गवत काढणे, बल्ली, बांबू, लाकूड आदींना तेल-पाणी, विटांना गेरू, झाडांना पिवळी माती आणि गेरू अशी कामे जयंतीपूर्वी केली जातात. जवळपास सर्वच कामे झालेली असून काही अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे. या कामांमुळे वातावरणात व आश्रमाच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. तयारी होत असली तरी पावसाचा धोकाही अधिक आहे. त्यामुळे पहिल्यांदा सारवण होऊनही झांज्या व झापड्याा काढण्यात आलेल्या नाहीत.
सप्टेंबर महिना संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. हस्ती नक्षत्र सुरू आहे. जोरदार पावसाची शक्यता असल्याने झांज्या व झापड्या काढण्यात आलेल्या नाही. आश्रमात गांधीजींची जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते.
यंदा या दिवशी राष्ट्रपित्याला १५० व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात येणार आहे. आश्रमात शाळा, महाविद्यालय, संस्था, सामाजिक संघटना, गांधीवादी, अभ्यासक आदी कार्यकर्ते आश्रमातील कार्यक्रमात भाग घेतात. यातून बापूंचा विचार व कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.
गांधी जयंती पर्वावर कन्याकुमारी ते जम्मू काश्मिर यात्रा
महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीचे १५० वर्ष आहे. तसेच आचार्य विनोबा भावे यांचे १२५ वे जयंती वर्ष असून महामानवांचा विचार व कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केरळ येथील पाच युवकांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मिर अशी मोटरसायकल यात्रा काढून आपली आदरांजली वाहणार आहे. शुक्रवारला यात्रेकरूंनी सेवाग्राम आश्रमला भेट दिली. २१ सप्टेंबर रोजी या यात्रेला प्रारंभ झाला. तीन हजार किमीचा प्रवास सेवाग्राममध्ये पूर्ण झाला आहे. सेंटर फाँर लाईफ लर्निंग या संघटने अंतर्गत ही यात्रा असल्याचे यात्रा प्रमुख अशोक यांनी सांगितले. पुढे जय जगतचा नारा पण आम्ही बुलंद करणार आहोत. एकता परिषदचे पी.वी.राजगोपाल विश्व शांती पदयात्रा काढणार असून गांधीजींच्या जयंती दिनी राजघाट नयी दिल्ली येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. यात आम्ही दोन दिवस सहभागी होणार आहोत.त्यानंतर ४ आॅक्टोबरला पुढील प्रवास सुरू होणार असल्याचेही अशोक यांनी सांगितले. सेवाग्राम येथील आश्रमात दोन दिवस मुक्काम केला असून त्यांनी आश्रमाच्या प्रार्थनेत सहभाग नोंदविला. स्मारक आणि आश्रमचा इतिहास जाणून घेतला तसेच दैनंदिन कार्य समजावून घेतले. या यात्रेत अशोक सह प्रसाद, विष्णू, यदू व संजू या पाच युवकांचा समावेश आहे. अशोक व प्रसाद हे नोकरी करतात तर बाकी तीन महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.