शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा उभ्या पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

वर्धा शहरासह परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आणि बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिस सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करणाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती. सेवाग्राम भागातील हमदापूर, कोपरा, चाणकी या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. सध्या शिवनगर ते हमदापूर या मार्गाचे काम सुरू असून ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. अशातच या मार्गाने ये-जा करणाऱ्यांच्या वाहनांचे चाक मातीत अडकत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर काही दुचाकी घसरल्याच्याही घटना घडल्या.

ठळक मुद्देकापूस भिजला : गारठ्यात वाढ, भाजीपाला पिकांचेही नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील गारठ्यात वाढ झाली आहे. शिवाय ढगाळी वातावरण कायम असताना मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून कापूस, तूर, गहू तसेच भाजापाला वर्गीय पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.वर्धा शहरासह परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आणि बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिस सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करणाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती. सेवाग्राम भागातील हमदापूर, कोपरा, चाणकी या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. सध्या शिवनगर ते हमदापूर या मार्गाचे काम सुरू असून ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. अशातच या मार्गाने ये-जा करणाऱ्यांच्या वाहनांचे चाक मातीत अडकत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर काही दुचाकी घसरल्याच्याही घटना घडल्या. परंतु, प्रकरण पोलीस कचेरीपर्यंत पोहोचले नाहीत. नजीकच्या पवनार येथे मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दमदार पाऊस झाला. तर बुधवारी सकाळी ढगाळी वातावरण कायम असताना पावसाच्या सरी बरसल्या. हिंगणघाट शहरासह परिसरात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तालुक्यातील कपाशी, तूर आणि चणा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्यातील अल्लीपूर परिसरात पावसाच्या सरी झाल्या. समुद्रपूर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. नंदोरी परिसरात मंगळवारी रात्री १० वाजता अचानक पाऊस कोसळला. त्यानंतर बुधवारी पहाटे ६ वाजता पुन्हा पावसाने हजेरी लावली. दुपारी १ वाजेपर्यंत थांबून थांबून पाऊस सुरू होता. सध्या कापूस वेचणीच्या कामाला कापूस उत्पादकांकडून गती दिली जात आहे. अशातच अचानक आलेल्या पावसामुळे बोंडातून निघालेला कापूस भिजला. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.सेलू तालुक्यातील घोराड तसेच परिसरात बुधवारी पहाटे आणि दुपारी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. कारंजा तालुक्यातील ठाणेगाव, सेलगाव, मोर्शी, हेटीकुंडी तर आष्टी तालुक्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी झाल्या. यामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. आर्वी तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. पिंपळखुटा भागातील तरोडा, गुमगाव येथे मंगळवारी रात्री तर बोरगाव (हा.) परिसरात बुधवारी दुपारी बऱ्यापैकी पाऊस झाला. यामुळे शेतातील कापूस भिजला. मोझरी (शे.) परिसरात मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे भाजीपाला वर्गीय पिकांसह कापूस, तूर पिकाला फटका बसला आहे. शिवाय थंडीत वाढ झाली आहे.पिकांवर रोगांसह किडींचा प्रादुर्भावमागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहेत. शिवाय थंडीही कायम आहे. त्यामुळे उभ्या पिकांवर विविध रोगांसह किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी, कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी कपाशी, तूर, चणा व गहू उत्पादकांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस