शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा १२६ गावांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी झाल्या. तर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आर्वी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील काही भागात गारपीट झाले. यामुळे संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ८४० हेक्टर वरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या आत तर ११ हजार ५०० हेक्टरवरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकपाशीचे सर्वाधिक नुकसान : २,३०८ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, फळ पिकांनाही बसला तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील आठवड्यात थंडीचा जोर कायम राहत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. याच पावसाचा जिल्ह्यातील तब्बल १२६ गावांना चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसाने सुमारे २ हजार ३०८ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली असून कपाशीचे सर्वाधिक नुकसान केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. शिवाय तसा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी झाल्या. तर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आर्वी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील काही भागात गारपीट झाले. यामुळे संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ८४० हेक्टर वरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या आत तर ११ हजार ५०० हेक्टरवरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. तर १५ हेक्टरवरील तूर पिकाचे ३३ टक्केच्या आत तसेच ४,३०० हेक्टरवरील तूर पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. १२ हेक्टरवरील चणा पिकाचे ३३ टक्क्यांच्या आत तर १,१०० हेक्टर वरील चणा पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. ५ हेक्टरवरील गहू पिकाचे ३३ टक्क्यांच्या आत तर ७०० हेक्टर वरील गहू पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. १२५ हेक्टर पिकावरील फळ पिकाचे ३३ टक्केच्या आत तर ३२५ हेक्टरवरील फळ पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. १० हेक्टरवरील भाजीपाला वर्गीय पिकाचे ३३ टक्केच्या आत तर १४० हेक्टरवरील भाजीपाला वर्गीय पिकांचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. सदर नुकसानग्रस्त शेतकºयांना कुठलाही नियम व अटी लागू न करता शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.आर्वी तालुक्यात सर्वाधिक नुकसानअवकाळी पावसामुळे वर्धा तालुक्यातील ८७४ हेक्टर, आर्वी तालुक्यातील १८,००० हेक्टर, कारंजा (घा.) तालुक्यातील १८८ हेक्टरवरील पिकाचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. असे असले तरी सेलू, देवळी, आष्टी (श.), हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील उभ्या पिकाचे कुठलेही नुकसान झाले नसल्याची नोंद कृषी विभागाने प्राथमिक अहवालात घेतली असून ज्या शेतकºयाचे नुकसान झाले असेल अशांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Rainपाऊस