शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत खंडित केला जिल्ह्यातील 2 हजार 270 ग्राहकांचा विद्युत पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

१ एप्रिलनंतर विद्युत देयक न भरणाऱ्या ग्राहकांची यादी तयार करून धडक थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण चार लाखांहून अधिक  व्यक्तींसह संस्थांना महावितरण पुरवठा करीत असले तरी  त्यापैकी तब्बल ६३ हजार व्यक्तींसह संस्थांनी १ एप्रिलपासून विद्युत देयक अदा केले नसल्याचे वास्तव आहे. ही थकबाकीची रक्कम ५१.८० कोटींच्या घरात आहे. हीच थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून सध्या धडक मोहीम राबविली जात आहे. विशेष म्हणजे वेळीच थकबाकी अदा करणाऱ्यांना व्याजाच्या रकमेतून सुट दिली जात आहे.

ठळक मुद्देथकबाकीदारांनो सावधान! विद्युत देयक न भरणाऱ्यांची महावितरण कापतेय विद्युत जोडणी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाचे कारण पुढे करून अनेकांनी त्यांच्याकडील विद्युत देयक वेळीच अदा केलेले नाही, तर विद्युत देयक माफ होईल, या आशेने अनेकांनी विद्युत देयक थकीत ठेवले. असे असले तरी वरिष्ठांकडून सूचना प्राप्त झाल्यावर महावितरणकडून सोमवारपासून धडक थकीत विद्युत देयक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील चार दिवसांत महावितरणने तब्बल २ हजार २७० थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.१ एप्रिलनंतर विद्युत देयक न भरणाऱ्या ग्राहकांची यादी तयार करून धडक थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण चार लाखांहून अधिक  व्यक्तींसह संस्थांना महावितरण पुरवठा करीत असले तरी  त्यापैकी तब्बल ६३ हजार व्यक्तींसह संस्थांनी १ एप्रिलपासून विद्युत देयक अदा केले नसल्याचे वास्तव आहे. ही थकबाकीची रक्कम ५१.८० कोटींच्या घरात आहे. हीच थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून सध्या धडक मोहीम राबविली जात आहे. विशेष म्हणजे वेळीच थकबाकी अदा करणाऱ्यांना व्याजाच्या रकमेतून सुट दिली जात आहे. याच सवलतीचा जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांनी लाभ घेत वेळीच विद्युत देयक भरावे, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात येत आहे. १ एप्रिलपासून विद्युत देयक न भरणाऱ्या विद्युत ग्राहकांची वीज जोडणी सध्या कापली जात असल्याचेही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सर्वाधिक थकबाकी वर्धा विभागातवर्धा विभागात १ लाख ७६ हजार वीज ग्राहक आहेत.  असे असले तरी त्यापैकी तब्बल २७ हजार ६०० ग्राहकांकडू सध्या विद्युत देयकाची तब्बल २४.४० कोटींची रक्कम थकली आहे. ही थकबाकी वेळीच वसूल व्हावी, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून विशेष प्रयत्न होत आहेत. 

 

टॅग्स :electricityवीज