शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

शैक्षणिक सत्रापासून शासनाने ओबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. पण अनेक पालकांनी त्यांच्या पाल्याचे जातीचे प्रमाणपत्र आणि बँक खाते न काढल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी अधिकची माहिती जाणून घेतली असता शिक्षण विभागही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे जबाबदारी कुणाची असा प्रश्न सुजान नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देजबाबदारी कुणाची? : शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा (आर्वी) : शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य शासनाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक सत्रापासून शासनाने ओबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. पण अनेक पालकांनी त्यांच्या पाल्याचे जातीचे प्रमाणपत्र आणि बँक खाते न काढल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी अधिकची माहिती जाणून घेतली असता शिक्षण विभागही दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत आहे. त्यामुळे जबाबदारी कुणाची असा प्रश्न सुजान नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (फक्त मुलींसाठी), गुणवत्ता शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, दहावी बोर्ड परीक्षा फी, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना (ओबीसी), पहिली ते दहावी डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, (डीएनटी/व्हीजेएनटी) आदी योजना शासनाने गरजूंसाठी कार्यान्वीत केल्या आहेत. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी या शिष्यव्रुत्तीसाठी लागणाऱ्या कादपत्रासाठी शाळा सुरू होताच पालकांना सूचना करून प्रत्यक्ष भेटी घेतल्या.त्यानुसार आपली दैनंदीन कामे टाकून पालक कामी लागले. शिवाय शिष्यवृत्तीसाठी लागणारे उत्पन्न दाखला, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, बँक खाते, जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे काही पालकांनी शाळेत जमा केली. मात्र, अनेक पालक त्यांच्या पाल्याचे बँक खाते तसेच जातीचे प्रमाणपत्र काढू शकले नाही. शिवाय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केल्याने हे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्याचे बँक खाते नसल्यास पालकाच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी. तेही नसेल तर शाळेच्या बँक खात्या रक्कम जमा करून ती विद्यार्थ्यांना वितरीत करावी. एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहता कामा नये, या प्रकरणी वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष दिले पाहिजे.- अजय काकडे, मुख्याध्यापक, उच्च प्राथमिक शाळा, वागदा (पुनर्वसन).ओबीसी आणि व्हीजे,एनटी, शिष्यवृत्तीसाठीचे हे पहिलेच वर्ष आहे. शासनाची गाईड लाईन असल्याने तशी कागदपत्राची पूर्तता व्हायला पाहिजे. यात शासकीय-निमशासकीय सर्व शाळेचा समावेश आहे. जे कागदपत्रे व फॉर्म पूर्ण झाले आहे ते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सादर करावे. जे कागदपत्र सादर करणार नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. १ फेब्रुवारीपर्यंत कागदपत्रे सादर करावी.- गोपाल अनासने, निरीक्षक, समाज कल्याण विभाग, जि.प. वर्धा.

टॅग्स :Studentविद्यार्थी