शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पोलीसच देतात दारूविक्रीला प्रोत्साहन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 1:55 AM

गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झाली.

ठळक मुद्देनागरिक, दारूविक्रेत्यांचा आरोप : बंदीची शक्यता धूसरच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झाली. मात्र नंतर हा व्यवसाय चांगलाच फोफावला. वर्धा शहरातील जिल्ह्यातील २ हजारावर तरुण, महिला आणि नागरिकांचे हात या व्यवसायात गुंतले आहेत. एकट्या वर्धा शहरात दारूचे हजारावर अड्डे आहेत.शास्त्री चौक परिसर, इंदिरानगर, कृष्णनगर, इतवारा, सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (निपाणी), महादेवपुरा, कानगाव, अल्लीपूर, धोत्रा यासह अन्य परिसरात परमिट रूमप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हे सर्वच अवैध बार कित्येक वर्षांपासून राजसरोसपणे सुरू आहेत. येथील परिस्थिती पाहिल्यावर जिल्ह्यात दारूबंदी आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. महिन्याकाठी आम्ही पोलिसांना मोठी देण देतो, या जोरावरच आमचे व्यवसाय बिनदिक्कतपणे चालतात, असे दारूविक्रेत्यांच्या गोटातूनच बोलले जाते. या बारशिवाय शहरातील बॅचलर रोड, आर्वी रोड, बसस्थानक रोड, रेल्वेस्थानक मार्गावरील पानठेले आणि खाणावळींमध्ये दारू रिचविण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे सायंकाळनंतर दारूरंगी रंगणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नागपूर मार्गालगतचे अनेक हॉटेल्सनीही गार्डन बारचे रूप धारण केले आहे. रात्री उशिरापर्यंत येथे मद्य रिचविणाऱ्यांची गर्दी असते.दारूविक्री आणि रिचविण्याची ठिकाणे ठाऊक आहेत. मात्र, कारवाई केली जात नाही. महामार्गावर अन्य ठिकाणी कार-दुचाकीसह दारूसाठा जप्त करून कारवाईचा देखावा केला जातो. यामुळे हा व्यवसाय मोठे जाळे विणताना दिसत आहे. वर्ध्यात दररोज एसटी, आलिशान गाडी, रेल्वेगाड्या आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूसाठा दाखल होतो. मात्र यात केवळ ‘अर्थ’कारण दडले असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कुठेही दारू‘बंदी’च मिळते. पोलिसांची काही पथके दुचाकीने रात्री गस्त घालताना दिसतात, ती केवळ वसुलीसाठी, असेही अनेक वॉर्डांतील नागरिकांनी लोकमतला सांगितले.शहरालगतच्या पारधी बेड्यांवर संबंधित पोलीस ठाण्याकडून नित्याने वॉश आउट मोहीम राबविली जाते. मात्र, ठोस कारवाईच होत नसल्याने हे धंदे पुन्हा ‘जैसे थे’ सुरू होतात. पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी लोखंडी ड्रमच्या मोठ्या संख्येसोबत फोटो सेशन करून नामानिराळे होतात.पोलिसांचेच अभय असल्याने जिल्ह्यात दारूबंदी धूसरच असल्याचा आरोपही नागरिकांतून केला जात आहे. पोलीस अधीक्षकांनी धडक मोहीम राबवून या अवैध व्यवसायाला पायबंद घालावा, अी मागणी जनमानसातून होत आहे.व्यक्तिगत वसुलीशहर व रामनगर ठाण्याची डीबी पथके आहेत. या पथकातील अनेक कर्मचारी सायंकाळनंतर शहरातील विविध दारू गुत्थ्यांवर व्यक्तिगत वसुली करताना दिसतात. इंदिरानगर, कृष्णनगर आदी भागात दररोजच पोलीस दोन-दोनच्या जोडीने येऊन पैसे घेऊन जातात, असे त्या-त्या परिसरातीलच नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदी