शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील मुख्य चौकात पोलीस करणार नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

मंगळवारी रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक धनाजी जळत, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच्या उपस्थितीत बॅचलर रोडवरील पावडे चौकात सुमारे दोन तास नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संशयीत वाहने आणि संशयीत व्यक्तींची चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्देसंशयितांची करणार चौकशी : विनपरवाना शस्त्र बाळगणाऱ्या नऊ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात वाढती गुन्हेगारी आणि विनापरवाना शस्त्र बाळगून दहशत पसरविण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता रामनगर पोलिसांकडून नाकाबंदी मोहिम राबविली जात आहे. मंगळवारी रात्री साडेसात ते नऊ वाजेपर्यंत पावडे चौकात नाकाबंदी करून संशयीत व्यक्तीसह वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.मागील काही दिवसांत शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. रामनगर तसेच शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दिवसाआड हाणामारी, जीवघेणे हल्ले करण्यात येत आहे. तसेच चिडिमारांचा वाढता हैदोस पाहता युवतींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रामनगर पोलिसांकडून रामनगर हद्दीत दरदिवशी दिड तास नाकाबंदी करण्यात येणार आहे.मंगळवारी रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक धनाजी जळत, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच्या उपस्थितीत बॅचलर रोडवरील पावडे चौकात सुमारे दोन तास नाकाबंदी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संशयीत वाहने आणि संशयीत व्यक्तींची चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे अनेकांवर वचक निर्माण होणार आहे.मोकळ्या मैदानांवरही राहणार लक्षरामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया स्वावलंबी, सर्कस मैदान, लोक महाविद्यालयासह इंदिरा बालोद्यानातही रात्रीच्या अंधारात अनेक गैरकृत्ये चालत असल्याने नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. याबाबत वांरवार तक्रारीही करण्यात आल्या. त्यामुळे आता रामनगर पोलिसांनी या मैदानावरही आपले लक्ष वळविले असून दररोज रात्री गस्त घालणार आहे.शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रतिबंधात्मक कारवाईची मोहिम शहरात राबविण्यात येत आहे. ही मोहिम निरंतर राहणार असून संशयती व्यक्ती व वाहनांवर कारवाई केली जाईल. तसेच शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे.धनाजी जळत, पोलीस निरीक्षक, रामनगर

टॅग्स :Policeपोलिस