शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

२४० ठिकाणी भरणार बैल पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:47 PM

यंदा हा सण शुक्रवार ३० ऑगस्टला आला असून या दिवशी वर्धा जिल्ह्यातील २४० ठिकाणी बैल पोळा भरणार आहे. शेतकऱ्यांच्या या उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देपोलिसांची राहणार नजर : १,२७८ ठिकाणी भरणार नंदी पोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसरात्र शेतीत राबणाऱ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैल पोळा. या दिवशी प्रत्येक शेतकरी आपल्या सर्जा-राजाला आकर्षक सजवून पोळ्यात नेतात. शिवाय त्यांना पंचपक्वान खाऊ घालतात. यंदा हा सण शुक्रवार ३० ऑगस्टला आला असून या दिवशी वर्धा जिल्ह्यातील २४० ठिकाणी बैल पोळा भरणार आहे. शेतकऱ्यांच्या या उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची या उत्सवाकडे करडी नजर राहणार आहे.वर्धा जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेती व शेतीपूरक व्यवसायावरच आहे. तर काही जण शासकीय नोकरी करून कुटुंबाचा गाढा ओढतात. असे असले तरी ऊन, पाऊस व थंडी याची तमा न बाळगता शेतकºयाच्या खाद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्याऱ्या बैल पोळा या सणाचे अजूनही महत्त्व कायम आहे. यंदा वर्धा जिल्ह्यात एकूण २४० ठिकाणी बैल पोळा तर १ हजार २७८ ठिकाणी नंदी पोळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५ ठिकाणी बैल पोळा तर ६२ ठिकाणी नंदी पोळा, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ५८ ठिकाणी नंदी पोळा, सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ६२ ठिकाणी नंदी पोळा, सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ३८ ठिकाणी नंदी पोळा, सेलू पोलीस स्टेशनच्या हद्दीत ७ ठिकाणी बैल पोळा तर ६२ ठिकाणी नंदी पोळा, सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ५२ ठिकाणी नंदी पोळा, दहेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ८ ठिकाणी बैल पोळा तर ५० ठिकाणी नंदी पोळा, हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत १८ ठिकाणी बैल पोळा तर १०२ ठिकाणी नंदी पोळा, वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ५२ ठिकाणी नंदी पोळा, अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ५१ ठिकाणी नंदी पोळा, समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ८० ठिकाणी नंदी पोळा, गिरड पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ७५ ठिकाणी नंदी पोळा, पुलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत २६ ठिकाणी बैल पोळा तर ९८ ठिकाणी नंदी पोळा, देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत १८ ठिकाणी बैल पोळा तर ७३ ठिकाणी नंदी पोळा, खरांगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ८४ ठिकाणी नंदी पोळा, आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २५ ठिकाणी बैल पोळा तर १२२ ठिकाणी नंदी पोळा, आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत १५ ठिकाणी बैल पोळा तर ७२ ठिकाणी नंदी पोळा, कारंजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १२ ठिकाणी बैल पोळा तर ४५ ठिकाणी नंदी पोळा तर तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत १० ठिकाणी बैल पोळा तर ४८ ठिकाणी नंदी पोळा भरणार आहे.बाजारपेठ सजलीपोळा या सणाचे औचित्य साधून बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेत वेसन, चवाळे, मटाटी, घुंगरू, झुल, बाशिंग, तोडे, मोरपंख, टाळ, झिला आदी साहित्य विक्रीकरिता आले आहे.आज देणार आवतनशुक्रवार ३० ऑगस्टला बैल पोळा साजरा करण्यात येणार असून गुरूवारी शेतकरी बांधव आपल्या लाडक्या सर्जा-राजाचे खांद शेकून त्यांना ‘आज आवतन घ्या... उद्या जेवाले या’ असे म्हणतात.