धामनदी पात्रातून पोकलॅन्ड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:23+5:30
येथील धाम नदी पात्रात गावाच्याविरुद्ध दिशेवरील काठावर कुठलीही परवानगी न घेता उत्खन्न केले जात असल्याची माहिती काही सुजान नागरिकांनी विजय तपासे यांना दिली. त्यांनी ही माहिती तातडीने सरपंच शालिनी आदमन, पं.स. सदस्य प्रमोद लाडे यांच्यासह तहसीलदार डुडुलकर आणि तलाठ्यांना दिली. माहिती मिळताच सर्वांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर पोकलॅन्ड जप्त करण्यात आला.

धामनदी पात्रातून पोकलॅन्ड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : कुठलीही परवानगी न घेता येथील धाम नदी पात्रात उत्खन्न केले जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदार प्रिती डुडुलकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून एक पोकलॅन्ड जप्त केला. महिला तहसीलदारांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध उत्खन्नमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
येथील धाम नदी पात्रात गावाच्याविरुद्ध दिशेवरील काठावर कुठलीही परवानगी न घेता उत्खन्न केले जात असल्याची माहिती काही सुजान नागरिकांनी विजय तपासे यांना दिली. त्यांनी ही माहिती तातडीने सरपंच शालिनी आदमन, पं.स. सदस्य प्रमोद लाडे यांच्यासह तहसीलदार डुडुलकर आणि तलाठ्यांना दिली. माहिती मिळताच सर्वांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर पोकलॅन्ड जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या अधिक चौकशीत सदर पोकलॅन्ड येळाकेळी येथील विलास घोंगडे यांच्या मालकीचा असल्याचे पुढे आले आहे. इतकेच नव्हे तर या अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने धाम नदी पात्रातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मुरूम चोरून नेण्यात आला. परंतु, चोरीचा मुरूम कुठे विक्री करण्यात आला याबाबतची माहिती अधिकारी जाणून घेत आहेत. या कारवाई प्रसंगी विनय तपासे, प्रमोद लाडे, संजय भोयर, ग्रा. पं. सदस्य राजू बावणे आदींची उपस्थिती होती.
माफियांना आशीर्वाद कुणाचा?
धाम नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात वेस्ट मटेरियल नदी पात्रात टाकण्यात आले. अद्यापही ते काढण्यात आलेले नाही. ही घटना ताजी असतानाच नदी काठचा मुरूम चोरून नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अवैध उत्खन्न माफियांना आशीर्वाद कुणाचा, असा आरोप सरपंच शालिनी आदमने यांनी केला आहे.
अवैध उत्खन्नाची माहिती मिळताच तहसीलदारांनी कारवाई केली. तहसीलदारांची कारवाई स्वागतार्ह आहे. परंतु, खोदकाम करणाºयाने नदी पात्रात मोठा खोल खड्डा तयार केला आहे. त्यामुळे भविष्यात मोठा धोका होऊ शकतो. परिणामी सदर खड्डा वेळीच बुजविणे गरजेचे आहे.
- शालिनी आदनमे, सरपंच, पवनार.