शेतात जबरदस्तीने केली नांगरणी
By Admin | Updated: May 21, 2016 02:14 IST2016-05-21T02:14:14+5:302016-05-21T02:14:14+5:30
येथील सर्व्हे नं. ३१२ आराजी ०.४० आर या शेतजमीनीचा १९७० पासूनचा ताबा संजय गणपत हिवसे व त्यांच कुटुंबियाकडे होता.

शेतात जबरदस्तीने केली नांगरणी
शेतकऱ्याचे ठाणेदार व तहसीलदारांना साकडे
आकोली : येथील सर्व्हे नं. ३१२ आराजी ०.४० आर या शेतजमीनीचा १९७० पासूनचा ताबा संजय गणपत हिवसे व त्यांच कुटुंबियाकडे होता. या शेतीवर दीपक भांडेकर रा. जामनी याने सदर शेतीवर जबरदस्तीने नांगरणी करून कब्जा केल्याची तक्रार हिवसे यांनी ठाणेदार व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
संजय हिवसे याच्याकडे गत ४५ वर्षांपासून सदर शेतीचा कब्जा आहे. सदर शेतीवर पीक घेत तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तलाठी प्रमाणपत्राचे आधारे त्याला भूदान यज्ञ मंडळ, नागपूर यांनी भूदान पट्टा क्र. ४२८/१२ जावक क्र. १२४३/१२ दि. १४ जून २०१२ रोजी भूमापण क्र. ३१२ आराजी ०.४२ भूदान पट्टा प्रदान केला. भूदान धारकाच्या नावाची नोंद या जमिनीच्या राजस्व रेकॉर्डमध्ये घ्यावी व सुधारित ७/१२ द्यावा, असे पत्र राजस्व विभागाला देण्यात आले आहे. मध्यंतरी भूदान पट्ट्यांबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे भूदान पट्टा नावे झाला नसल्याचे व फेरफार प्रकरणी वरिष्ठ निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. ४५ वर्षांपासून ताब्यात असलेल्या या शेतीवर भांडेकर यांनी एकाएकी कब्जा केल्यामुळे हा शेतकरी गोंधळून गेला आहे. तहसीलदार व ठाणेदार यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)