लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : श्रीक्षेत्र टाकरखेड येथे नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाणी फाऊंडेशन आणि लोकप्रतिनिधी, अंगणवाडीसेविका आदींनी पुढाकार घेत ११ एकरातील वर्धा नदीपात्र ट्रॅक्टरद्वारे नांगरले.१९ मे ला सकाळी ७ वाजता पाणी फाऊंडेशनची चमू, सरपंच सारिका मेश्राम, विनोद डोये, विजय भुरभुरे, सुधीर देशमुख, रोजगारसेवक शरद पेठे, वैशाली वानखेडे, मारोतराव शेंडे, उपसरपंच नंदा नेवारे, सदस्य मंजूषा मोकलकर, अंगणवाडीसेविका मंजूषा डोये, छाया पेठे यांनी याकरिता पुढाकार घेतला.तब्बल ४० वर्षांनंतर नदीपात्र कोरडे झाले. यामुळे पाणीसमस्या गंभीर झाली. पुढीलवर्षी तरी जलसंकट निर्माण होऊ नये म्हणून पाणी फाऊंडेशनच्या वतीने नदी नांगरणीचा नावीन्यपूर्ण उपक्रम टाखरखेड ग्रामस्थांनी श्रमदानातून राबविला. पावसाचे पाणी जेव्हा पडेल तेव्हा अधिकाधिक नदीपात्रात मुरले पाहिजे. पावसाचे पडलेले पाणी वाहून न जाता मातीच्या गर्भात ते पाणी साचले पाहिजे, जेणेकरून टाकरखेड शिवारामधील विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरींची पाण्याची पातळी वाढेल आणि जलसंकटातून सुटका होईल.नदीपात्रातील माती घट्ट झाल्याचे नांगरणीवेळी ग्रामस्थांना जाणवले. बऱ्याच वर्षांपासून वरच्या भागाची माती सिंमेटसारखी पक्की झालेली होती. नदीपात्राच्या नांगरणीमुळे मातीचा मुरूम झालेला असून या मातीत आता जास्तीत जास्त पाणी वाहून न जाता मुरणार, जिरणार आहे. जिरलेल्या, थांबलेल्या पाण्याचा फायदा टाकरखेड शिवाराला येत्या काळात होणार असून ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे. या सर्व श्रमदानात टाकरखेड येथील सर्व ट्रॅक्टरमालकांनी स्वत:चे डिझेल वापरून तब्बल दोन तास नदीपात्राची नांगरणी केली. यात प्रामुख्याने रमेश सहारे, संदीप पेठे, अनिल लांजेवार, गौतम काळबांडे, विजय अतकरणे, रोशन भुरभुरे, रमेश गाऊत्रे तसेच परतोडा येथील सुभाष यादव व अतुल डोंगरे आदींनी दुष्काळाशी दोन हात, माती अडवा पाणी जिरवा या तत्त्वासाठी युद्धपातळीवर तांत्रिक व आर्थिक सहाय्य केले.
११ एकर नदीपात्राची श्रमदानातून नांगरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:00 IST
श्रीक्षेत्र टाकरखेड येथे नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाणी फाऊंडेशन आणि लोकप्रतिनिधी, अंगणवाडीसेविका आदींनी पुढाकार घेत ११ एकरातील वर्धा नदीपात्र ट्रॅक्टरद्वारे नांगरले.
११ एकर नदीपात्राची श्रमदानातून नांगरणी
ठळक मुद्देपावसाचे जिरणार पाणी : जलसंकटावर मात करण्याचा टाकरखेडवासीयांचा निर्धार