प्लास्टिक बंदीसाठी पालिकेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:32 PM2018-07-04T23:32:15+5:302018-07-04T23:33:07+5:30

महाराष्ट्र शासनाने राज्यभर प्लास्टीक बंदी लागू केली. त्यानंतर आता कारंजा नगर पंचायतीने नागरिकांचे प्रबोधन करून प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे.

Plastic initiatives for plastic ban | प्लास्टिक बंदीसाठी पालिकेचा पुढाकार

प्लास्टिक बंदीसाठी पालिकेचा पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देबैठक घेऊन नागरिकांचे प्रबोधन : कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : महाराष्ट्र शासनाने राज्यभर प्लास्टीक बंदी लागू केली. त्यानंतर आता कारंजा नगर पंचायतीने नागरिकांचे प्रबोधन करून प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे.
प्लास्टीकबंदीबाबत जनतेत व व्यावसायिकांमधील निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी कारंजा नगर पंचायतच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत व नगराध्यक्षा कल्पना मस्की यांनी कारंजा शहरातील प्रमुख दुकानदार व सामाजिक कार्यकर्त्यांची सभा घेवून प्लास्टीक बंदीबद्दल शासनाचे नवीन धोरण समजावून सांगितले. सुधारीत अधिसूचनेनुसार २००. मी.मी. धारण क्षमता असलेल्या प्लास्टीक बाटलीवर बंदी घालण्यात आलेली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची २ ग्रॅम पेक्षा कमी वजनाची प्लास्टीक पिशवी पॅकींग करिता वापरता येणार नाही. या पॅकींग प्लास्टीक पॅकेटवर उत्पादकांचा तपशिल, प्लास्टीकचा प्रकार कोड नंबरसह पूनर्रखरेदी मुद्रीत करणे, व्यावसायिकांला बंधनकारक राहणार आहे, अशी माहिती दिली.
तसेच स्थानिक पॅकेजींग मटेरियल उत्पादन करणारे उद्योग व अशा उत्पादक उद्योगाच्या संघटना व किरकोळ विक्रेते यांनी संयुक्तपणे ग्राहकांनी वापरलेले प्लास्टीक पूर्नरखरेदीद्वारे गोळा करण्याची व्यवस्था करणे व गोळा केलेल्या प्लास्टीक मटेरियलचे पुनर्रचक्रण करून विल्हेवाट लावणे बंधनकारक राहील. याची माहिती सभेत देण्यात आली.
गायी म्हशी व इतर प्राण्यांनी इतरत्र पडलेले प्लास्टीक खाल्यामुळे प्राण्यांचेही आरोग्य धोक्यात आहे. प्लास्टीक कुजत नाही. सहज जळत नाही. व जाळल्यानंतर अत्यंत विषारी असा कार्बनमोनो आॅक्साईड बाहेर निघून हवा प्रदुषित होते, एवढे सर्व दुष्परिणाम असणाऱ्या प्लास्टीकचा अतिरेकी वापर टाळून, प्लास्टीक बंदी, पुढील उज्ज्वल भविष्य व देशहितासाठी सर्वांनी स्विकारली पाहिजे, असे आवाहन नगराध्यक्षांनी सभेत केले.
सभेला रामचंद्र भांगे राम मोटवाणी, अग्रवाल, बकुल जसानी, राजू गुप्ता, राठी, टावरी, आदी व्यावसायिक उपस्थित होते.

Web Title: Plastic initiatives for plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.