शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील यात्रेकरू येणार गांधी आश्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

यात्रेत वेगवेगळ्या २०० ठिकाणावरून निघालेले ६०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात्रेकरूंची व्यवस्था यात्री निवास आणि नयी तालिम समिती परिसरात करण्यात आली आहे. यात्रेतील पदयात्री आश्रमात पोहचल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्यावतीने सूतमाळेने स्वागत करण्यात येईल. सर्व यात्रेकरू सायंकाळी प्रार्थनेत सहभागी होतील. यात्री निवास परिसरात यात्रेकरूंचे अनुभव कथन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देविनोबांची जयंती : गुरूवारी पाहुणे पवनारला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : यंदा आचार्य विनोबा भावे यांचे १२५ जयंती वर्ष साजरे होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जन्मदिनी मित्र मिलनचे पवनार येथे आयोजन करण्यात आले आहे. देशभरात या निमित्ताने विचार, कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा या साठी सर्वोदयींनी यात्रा काढली आहे. यात्रा बुधवारी १३ रोजी सायंकाळी सेवाग्राम आश्रमात पोहचणार आहे.या यात्रेत वेगवेगळ्या २०० ठिकाणावरून निघालेले ६०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात्रेकरूंची व्यवस्था यात्री निवास आणि नयी तालिम समिती परिसरात करण्यात आली आहे. यात्रेतील पदयात्री आश्रमात पोहचल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्यावतीने सूतमाळेने स्वागत करण्यात येईल. सर्व यात्रेकरू सायंकाळी प्रार्थनेत सहभागी होतील. यात्री निवास परिसरात यात्रेकरूंचे अनुभव कथन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरूवारी सकाळी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यात्रेला हिरवी झेंडी दाखवून यात्रा पवनार दिशेने रवाना होईल.सिंधूदुर्ग येथून येणार यात्रासिंधूदुर्ग जिल्ह्यातील गोपूरी आश्रमातून संवाद यात्रा निघाली आहे. हे वर्ष महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती, आचार्य विनोबा भावे,कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन शतकोत्तर रजत जयंती आणि प्रकाश मोहाडीकर जन्मशताब्दी संयुक्त अभियान अंतर्गत संवाद यात्रा काढलेली आहे. सदर यात्रा १४ रोजी वर्धेत पोहचणार असून १५ रोजी पवनार येथील ब्रम्ह विद्या मंदिरात या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकसंवाद घालण्यात येणार आहे.देशभरातून यात्रेकरू सेवाग्राम आश्रमात येणार आहे. त्यांचे स्वागत आणि मनोगताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. १५ ते १७ पर्यंत पवनार येथे विनोबाजींच्या जन्मदिनानिमित्य विनोबा मित्र मिलन कार्यक्रम होणार आहे.सर्व यात्रेकरू त्यात सहभागी होतील. सेवाग्राम येथूनच ते पवनार येथे जातील.- टी.आर.एन.प्रभू,अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सर्वोदयी येत आहे. बा,बापू आणि बाबांना मानणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने जिल्ह्यात त्यांचे स्वागत आहे.- मोहन खैरकार, अध्यक्ष जिल्हा सर्वोदय मंडळ.