शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

सायबर भामट्यांची फिशिंग सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

महिनाभरात सायबर सेलकडे अशा ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींचे पैसे परत आणण्यात सायबर विभागाला यश आले आहे. फोन पे सर्व्हिस सेंटर वरून बोनस पॉर्इंट आपल्या खात्यात ट्रान्सफर करण्याच्या नावाने ऐनीडेस्क सारखे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यास सांगून मोबाईलचा ताबा स्वत: घेऊन खात्यातून रक्कम काढून घेत फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देसत्तरवर तक्रारी : तीन महिन्यांत तब्बल आठ लाखांनी केली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यातील मित्र-मैत्रिणींना पैशाची गरज आहे, असे सांगून पैशाची मागणी करण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात ऑनलाईन गंडविल्याच्या ७० च्यावर तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या असून सुमारे सात ते आठ लाखांची फसवणूक भामट्यांनी केल्याची माहिती सायबर सेलने दिली आहे.संचारबंदी काळात सर्व ठप्प असताना भामटे व्यापाऱ्यांना खरेदीच्या नावे लिंक पाठवून किंवा पाच रुपये, दहा रुपये डिपॉझिट करण्यास सांगून खात्याची माहिती घेतली जाते. ओएलक्स, आर्मी मॅनच्या नावाने महागडे वाहन, कमी किंमतीत मोबाईल विक्रीचे आमिष देऊन फसवणूक केली जात आहे.महिनाभरात सायबर सेलकडे अशा ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींचे पैसे परत आणण्यात सायबर विभागाला यश आले आहे. फोन पे सर्व्हिस सेंटर वरून बोनस पॉर्इंट आपल्या खात्यात ट्रान्सफर करण्याच्या नावाने ऐनीडेस्क सारखे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यास सांगून मोबाईलचा ताबा स्वत: घेऊन खात्यातून रक्कम काढून घेत फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहे.आता सायबर भामट्यांनी नवीन फंडा वापरणे सुरू केले असून हॉटेलमालकांना जेवणाचा ऑर्डर देऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरू केला आहे. वर्ध्यातील एका हॉटेलमालकाला गंडविण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती आहे.ज्येष्ठ नागरिक, महिला लक्ष्यज्येष्ठ नागरिकांना मोबाईलवरून ई-व्यवहार करताना त्यातील खाचाखोचा ठावूक नसतात. भामटे त्याचाच फायदा घेतात. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाणे अडचणीचे होते. बºयाचदा एकटेदुकटे ज्येष्ठ नागरिक ई-व्यवहारात फसविले जातात. ई-साक्षरतेचा अभाव घातक ठरू शकतो. त्या अज्ञानामुळे हे भामटे गंडा घालण्यात यशस्वी होतात. ई-व्यवहार काही सेकंद, मिनिटांचा असतो. देश वा परदेशातून केल्या जाणाऱ्या घोटाळ्याचा तपास करणे बऱ्याचदा अवघड ठरते. ऑनलाईन ठगांकडून ही रक्कम एटीएमवरून काढून घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकदा ही रक्कम काढली गेली की त्याचा तपास करण्यस अडचणी येतात.गुन्हेगारांची चलाखीगुन्हेगारांकडे काही वेगळे, अद्यायावत वा नवीन तंत्रज्ञान नसते. परंतु, ते मानवी कल लक्षात घेऊन सापळा रचतात. त्यातून इमेल, अ‍ॅप, लिंक, बोगस कॉल सेंटर वगैरे सापळे रचले जातात. त्या सापळ्यात अडकविण्याचे तंत्र मोडून काढण्यासाठी सर्वसामान्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.पोलिसी मर्यादांचा गैरफायदाआॅनलाईन फसवणूक करणाºया गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोबाईलची मदत होते. मात्र, पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नयेत, यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेल्या सीमकार्डचा वापर केला जातो. सीमकार्ड ज्याच्या नावे आहे त्याचा काहीच सहभाग नसतो. आॅनलाईनवरून फसवणूक करून आलेली रक्कम बँकेत वळती करण्यासाठी एखाद्या गरीब व्यक्तीस सोबत घेतले जाते. त्याच्या नावावर रक्क्म वळती करून त्यास कमिशनपोटी काही रक्कम दिली जाते. या बँक खातेदारापर्यंत पोलीस पोहोचतात परंतु, सूत्रधार वेगळाच असतो.बाजारात होते डेटा विक्रीबँकेमधून फोन आल्याचे भासवणाºया भामट्यांकडे आपल्या खात्याचा बºयापैकी तपशील असतो. बँकांकडून पुरविल्या जाणाºया क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाच्या सुरुवातीचे काही क्रमांक सारखेच असतात. हे भामटे तेच क्रमांक सांगतात. आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो. वेगवेगळ्या ऑफरच्या नावागाली मोबाईल क्रमांक घेतले जातात. यातून मोबाईलचा डेटा मोठ्या प्रमाणात जमा होवून त्याची विक्री होते. म्हणूनच वेगवेगळ्या कंपन्या, बँकांच्या एजन्सीकडून सारखे फोन येतात.खातरजमा होत नाहीआपल्या बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड, इ-मेलचा पीन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये,असे वारंवार सांगण्यात येते. बँकांसह सायबरतज्ज्ञ, पोलीस यंत्रणा वेळोवेळी सूचना करत असतात. परंतु, बँकेतून कॉल आल्याचे भासवणाऱ्या भामट्यांवर अतिविश्वास ठेवणे ग्राहकांना भोवते. लोकांचा अ‍ॅपवर, बँकेच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याने त्याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही. म्हणून शहरात आॅनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे.आर्थिक गुन्हे सर्वाधिकजिथे पैसा, तिथे धोका हे तत्त्व सायबर गुन्ह्यांमध्येही दिसून येते. ई-शॉपिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल अ‍ॅपमधून होणाºया खरेदी-विक्री व्यवहारातून मोठ्या प्रमाणात पैसे हडप केले जातात. त्यामुळेच सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर येते आहे. शहरात मागील आठ दिवसांमध्ये ८ ते १० जणांची फसवणूक झाली. आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व उच्च शिक्षित आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम