पाळीव कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यात गाडी उलटून मालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2023 18:55 IST2023-01-20T18:55:07+5:302023-01-20T18:55:36+5:30
Wardha News कारमधून पाळीव कुत्र्याला घेऊन जात असताना अचानक त्याने केलेल्या हल्ल्याने भांबावून जाऊन कार दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात कारचालक गोपाल किशन सिंग (५८) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी सूक्ष्ममा गोपाल सिंग या जखमी झाल्या आहेत.

पाळीव कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यात गाडी उलटून मालक ठार
वर्धाः कारमधून पाळीव कुत्र्याला घेऊन जात असताना अचानक त्याने केलेल्या हल्ल्याने भांबावून जाऊन कार दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात कारचालक गोपाल किशन सिंग (५८) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी सूक्ष्ममा गोपाल सिंग या जखमी झाल्या आहेत.
हा अपघात शुक्रवारी दुपारी २ वाजता नागपूर-चंद्रपूर मार्गावर नांदोरी शिवारात झाला. गोपालसिंग हे त्यांच्या कारमधून पत्नीसह जात असताना सोबत असलेल्या कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडकली व रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन उलटली. या अपघातात गोपालसिंग यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.