अत्याधुनिक यांत्रिक कार्यपद्धतीत सामान्यांची फरफट

By Admin | Updated: March 20, 2015 01:47 IST2015-03-20T01:47:55+5:302015-03-20T01:47:55+5:30

पैसा सुरक्षित राहून अडचणींच्या वेळी कामी पडावा म्हणून बहुतेकांनी राष्ट्रीयकृत बँकांत बचत खाते उघडून मिळकत जमा केली़ सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्ती...

People's work in state-of-the-art mechanical work | अत्याधुनिक यांत्रिक कार्यपद्धतीत सामान्यांची फरफट

अत्याधुनिक यांत्रिक कार्यपद्धतीत सामान्यांची फरफट

पुलगाव : पैसा सुरक्षित राहून अडचणींच्या वेळी कामी पडावा म्हणून बहुतेकांनी राष्ट्रीयकृत बँकांत बचत खाते उघडून मिळकत जमा केली़ सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्ती वेतनही याच बँकांतून ते मिळवित आहे; पण संगणकीय युगात बँकेत आर्थिक व्यवहारासाठी कार्यरत जीसीसी वा एटीम मशीन सर्वसामान्य खातेदार, ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक ठरत आहे़ तशा तक्रारीही खातेदार करताना दिसतात़
स्थानिक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मागील कित्येक वर्षांपासून सुरक्षित व सुलभ कार्याच्या दृष्टीने हजारो नागरिकांनी खाते उघडून आपले आर्थिक व्यवहार सुरू केले़ पूर्वीच्या कार्यप्रणालीमध्ये विड्रॉलने पैसे जमा करणे, इतरत्र ट्रान्सफर करणे आदी व्यवहार फॉर्म भरून चालत होते; पण अलीकडे संगणकीय युगात टोकण व्यवहार बंद होऊन संगणकीय कार्य प्रणालीमुळे आर्थिक व्यवहार जलद व्हायला लागले़ यातही विड्राल पद्धतीने पैसे जमा करणे, ट्रान्सफर करणे ही पद्धती सुरूच असल्याने सर्वसाधारण खातेदार वा ज्येष्ठ नागरिकांना व्यवहार सरळ व सोपा वाटत होता़ अलीकडेच बँकेने खातेदारांसाठी एटीएम सुरू केले़ सुशिक्षित व घाईगर्र्दीच्या खातेदारांना तेही सोयीचे वाटू लागले; पण काही महिन्यांपासून बँकेच्या स्थानिक शाखेने पैसे जमा करणे, ट्रान्सफर करणे वा काढणे या व्यवहारासाठी बँकेच्या काऊंटरवर ग्रीन क्रेडीट कार्ड मशीन बसविली़ या मशीनच्या साह्याने एटीएम कार्डचा वापर करून आर्थिक व्यवहार करण्याची सक्ती करणे सुरू केले़ या सुविधा सामान्य व ज्येष्ठ नागरिकांना अडचणीच्या ठरत आहेत़ बँकेने त्यांचा विचार करणे गरजेचे झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: People's work in state-of-the-art mechanical work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.