केवळ पदे घेऊन मिरविणाऱ्यांना पक्षात स्थान नाही

By Admin | Updated: June 21, 2017 00:46 IST2017-06-21T00:46:25+5:302017-06-21T00:46:25+5:30

पक्षवाढीसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असते. सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष वाढतो. पक्षाची ताकद कार्यकर्ता असतो;

The people who take only the posts are not in the presence | केवळ पदे घेऊन मिरविणाऱ्यांना पक्षात स्थान नाही

केवळ पदे घेऊन मिरविणाऱ्यांना पक्षात स्थान नाही

समीर देशमुख : राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पक्षवाढीसाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असते. सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष वाढतो. पक्षाची ताकद कार्यकर्ता असतो; पण काही पदाधिकारी केवळ पदे घेऊन मिरवित असतात. अशा ‘व्हिजीटींग कार्ड’ पदाधिकाऱ्यांना यापूढे पदावर राहता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी केले.
बजाज चौक येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महिला अध्यक्षा शरयू वांदिले, न.प. सदस्य मुन्ना झाडे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. खलील खतीब, रायुकाँ जिल्हाध्यख संदीप किटे उपस्थित होते. निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सत्तेत असताना सर्वांनी जोमाने पक्ष संघटनासाठी कार्य केले. तळागाळातील सर्वसामान्यांना पक्षाच्या प्रवाहात सामील केले; पण आता सत्ता नाही म्हणून निराश होता कामा नये. आपण सर्वांनी समाजसेवचं कार्य सुरू ठेवावे. जनतेच्या समस्या काय आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी सर्वांच्या समस्या ओळखून त्यांना वाचा फोडली पाहिजे. शहरातील प्रत्येक वॉर्ड व गाव तेथे राष्ट्रवादीची शाखा सुरू केली पाहिजे. समाजमन जोपासणारे युवकही पक्षात आले पाहिजे. येत्या दिवसांत काही पदांचे फेरबदल करून नवे चेहरे देणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
याप्रसंगी झाडे, प्रा. खतीब, वांदिले यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला न.प. चे आजी, माजी सदस्य, पं.स. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The people who take only the posts are not in the presence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.