शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:00 AM2020-01-18T06:00:00+5:302020-01-18T06:00:12+5:30

या रस्त्याच्या बांधकामाचा कं त्राट ठाणे येथील एस. कंस्ट्रक्शन नामक कंपनीने घेतला आहे. या कंपनीचे अभयकुमार सिंग यांनी शेतकरी शार्दुल वांदिले यांच्या मालिकेच्या शेत सर्व्हे क्रमांक-१२ मधील शेतातील मुरुमाच्या मोबदल्यात सुपीक माती देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वसानानुसार कंत्राटदाराने शेतातील ४ हजार पेक्षा जास्त मुरुम खोदून नेला. या उत्खननामुळे शेतात मोठमोठे खड्डे तयार झाले आहे.

Pay damages to farmers | शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला द्या

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला द्या

Next
ठळक मुद्दे्रप्रहारची मागणी : ४ हजार ब्रास मुरुमाची केली चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या सेवाग्राम मार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरातील एफ-२ लेआऊटमधील रस्त्याचे बांधकाम करण्याकरिता कंत्राटदाराने शेतकºयाची दिशाभूल करुन शेतातील ४ हजार ब्रासपेक्षा अधिक मुरुमाची चोरी केली. याप्रकरणी प्रहारच्यावतीने शेतकऱ्यांची बाजू मांडून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
या रस्त्याच्या बांधकामाचा कं त्राट ठाणे येथील एस. कंस्ट्रक्शन नामक कंपनीने घेतला आहे. या कंपनीचे अभयकुमार सिंग यांनी शेतकरी शार्दुल वांदिले यांच्या मालिकेच्या शेत सर्व्हे क्रमांक-१२ मधील शेतातील मुरुमाच्या मोबदल्यात सुपीक माती देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वसानानुसार कंत्राटदाराने शेतातील ४ हजार पेक्षा जास्त मुरुम खोदून नेला. या उत्खननामुळे शेतात मोठमोठे खड्डे तयार झाले आहे. त्यानंतर शेतकरी वांदिले यांनी कंत्राटदाराला मातीबद्दल विचारणा केली असता टाळाटाळ केली जात आहे. असाच प्रकार सर्व्हे क्रमांक १३७/१ व सर्व्हे क्रमांक १३० मध्येही घडला आहे. या शेतामधून मुरुमाची उचल करण्यासाठी कंत्राटदाराने प्रशासनाकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र कंटदाराने कोणतीही परवानगी न घेता शेतकºयाचे शेत पोखरण्यासह शासनालाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविला. शेतकºयांनी या प्रकाराची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांना मिळताच त्यांनी तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्याकडे रितसर तक्रार करुन शेतकºयाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तहसीलदार डुडुलकर यांनी मंडळ अधिकारी डेहने व तलाठी नांदूरकर यांना सोबत घेऊन मौका चौकशी केली. त्यांनी चौकशीचे आदेश देऊन संबंधित कंत्राटदार व एमआयडीसी व्यवस्थापक यांना विचारणा करण्यासाठी बोलाविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आदिवासी विकास युवा परिषदचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडावी, प्रहारचे शैलेश खोसे, शार्दूल वांदिले, सुरज आत्राम उपस्थित होते.

Web Title: Pay damages to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी