शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हा

By admin | Updated: June 12, 2016 01:52 IST

राज्यात २ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै रोजी सुमारे ७ लक्ष ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : जिल्ह्यात ७.४० लाख झाडे लावणार वर्धा : राज्यात २ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ जुलै रोजी सुमारे ७ लक्ष ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी जनतेने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. राज्यात १ जुलै रोजी एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातही ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी नवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख तसेच स्वयंसेवी संस्थेची बैठक आयोजित करण्यात आली. वृक्षरोपण मोहिमेत वन विभाग, सामाजिक वनीकरण, महसूल व इतर सर्व विभाग प्रमुख, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, निसर्ग सेवा समिती आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून मोहीम यशस्वी करण्यात येणार असून एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्व जनतेचेही सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात वृक्षरोपण मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षरोपणासाठी झाडे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी दिल्या. १ जुलै रोजी वृक्षलागवड करण्याबाबत वन विभागास जंगलक्षेत्रातील ५८ रोपवनस्थळी एकूण ४ लक्ष ९९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग २० हजार असून शासनाचे २० विभाग व त्याअंतर्गत यंत्रणांना २ लक्ष २० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाकडे इतर विभाग व यंत्रणांसाठी वर्धा वनपरिक्षेत्र, गांधीबाग, रोपवाटिका, वर्धा, हिंगणी वनपरिक्षेत्र, हिंगणी रोपवाटिका, समुद्रपूर वनपरिक्षेत्र, मोहगाव रोपवाटिका, आष्टी वनपरिक्षेत्र, पिलापूर रोपवाटिका, तळेगाव वनपरिक्षेत्र, जसापूर रोपवाटिका, कारंजा वनपरिक्षेत्र, आमझरी रोपवाटिका, आर्वी वनपरिक्षेत्र, सारंगपुरी रोपवाटिका, खरांगणा वनपरिक्षेत्र, खरांगणा रोपवाटिका येथे उपलब्ध आहे. वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच इतर सर्व यंत्रणेचे अधिकारी यांनी नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर व प्रत्येक तालुक्याकरिता एक तालुका समन्वयक लागवड अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हा समन्वयक म्हणून सामाजिक वनिकरणचे उपसंचालक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वृक्ष लागवड मोहिमेत जास्तीत जास्त लोकसहभाग व्हावा या दृष्टीने वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रोप लागवड कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधी, संस्थाचे पदाधिकारी, विद्यार्थी, सरपंच, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था आणि जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग असणार आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, सामाजिक वनिकरणचे तळवेकर उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)