पाकिस्तानातून फोफावलेला दहशतवाद भारताला बाधा पोहचवित आहे. यावर वारंवार नियंत्रण मिळविणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सर्जीकल स्ट्राईक सारख्या मोहीम राबविल्यास दहशतवादाला ब्रेक लागतो, असे प्रतिपादन ले. जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले. ...
महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यात सेवानिवृत्तीची मर्यादा पाच वर्षांनी कमी केल्याने वर्धा जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यात आल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिली. ...
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये नाफेड पीएसएस अंतर्गत तूर खरेदीचा शुभारंभ समितीचे सभापती हिम्मत चतुर यांच्या हस्ते करण्यात आला. ...
तालुक्यातील किन्हाळा येथील शेतकरी जनार्धन बोबडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी जनार्धन यांचे अवयवदान केल्याने चौघांना जीवनदान मिळाले आहे. ...
आॅनलाईन लोकमतवर्धा : आधीच मेटाकुटीस आलेल्या ेशेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक असल्याने श्वापदांचे हल्ले नित्याचे झाले आहेत. मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात ३२ शेतकरी, शेतमजुरांवर श्वापदांनी हल्ले केले ...
जिल्ह्यात अवकाळी पाऊस तथा गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या गहु, चणा, तूर, फळबाग, कांदा, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी जिल्हा काँगे्रस कमिटीने केली. ...
कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त नगर परिषदेद्वारे स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीला खा. रामदास तडस यांनी झेंडी दाखवून सुरूवात केली. या जागृती रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. ...
पिंपळधरी येथे १२ फेबु्रवारी रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट झाले. यात गाव बेचिराख झाले. तहसील प्रशासनाने गावात मदत पोहोचविली; पण काहींनी आंदोलनात धन्यता मानली. यास विरोध केला असता तहसीलदारांविरूद्धच गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केला. ...