ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वध्याहून पवनारकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला विरुद्ध दिशेने येणाºया कारची धडक होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना येथे गुरुवारी ११.३० च्या सुमारास घडली. ...
हिंगणघाटमधील नगरसेवक प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत. ...
देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे. ...
नगर परिषदेचा नांदगाव येथे असलेला डम्पिंग यार्ड काही कारणाने वादात सापडला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची सध्या काही चिन्हे नसताना शहरातील मोहता मिल लगत असलेल्या रिकाम्या जागेवर अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्माण होताना दिसत आहे. ...
एप्रिल महिन्याच्या मध्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट तीव्र होते. यावर्षीही आर्वी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत दहा गावांत पाणीटंचाईचे सावट तीव्र झाले आहे. ...
वर्धा-नागपूर महामार्गावर विद्याभारती कॉलेजजवळ गतिरोधक तयार करण्यात आले; पण पांढरे पट्टे मारले नसून सांकेतिक फलकही नाही. यामुळे अपघात होतात. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांच्या कुटुंबातील महिला कारने नागपूरकडे जात असता चालकाने गतिरोधकावर वेग कमी क ...
एरव्ही शांत समजल्या जाणाऱ्या येथील उच्च शिक्षितांची वसाहत शिक्षक कॉलनीत मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच व एकाच चाळीतील तब्बल चार घरे चोरट्यांनी फोडून ऐवज लांबविला. ...
शासकीय तूर खरेदी यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणीचीच ठरली. यात आतापर्यंत झालेल्या तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. त्याची प्रतीक्षा असतानाच तूर खरेदीच्या आॅनलाईन नोंदणीला बुधवारी विराम देण्याचे शासन आदेश धडकले. ...