चणा व तूर खरेदीच्या नाफेडच्या आॅनलाईन प्रक्रियेचे देवळीत तीनतेरा वाजले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी पासून तुरीच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी दिलेल्या कागदपत्रांची नाफेड प्रशासनाने कुठेही नोंद न घेतल्याने या परिसरातील शेकडो शेतकरी वाऱ्यावरच आहेत. ...
नामवंत कवी तथा वक्ते कुमार विश्वास यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचे आश्रम तसेच पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम गाठून गांधी व विनोबा भावे यांचे विचार समजावून घेतले. ...
राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या न ...
वर्धा-नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्स व कार अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत कोसळली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. ...
स्थानिक इंदिरा येथील अशोक चकोले यांचे घर अचानक कोसळले. यात त्यांची आई अनुसया मारोतराव चकोले (८०) यांचा दबून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. तर पत्नी व मुलगी किरकोळ जखमी झाल्या. ...
देशातील प्रत्येक तरुण, नागरिकांनी देशाप्रती प्रेम व्यक्त केले पाहिजे, व स्वत:प्रती आत्मविश्वास बाळगला पाहिजे. तेव्हाच आपले भविष्य उज्ज्वल होईल. मात्र आज आपण देशाप्रती सकारात्मक भाव ठेवताना दिसत नाही. विदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचंड मोठा दबदबा आहे. ...
दारू बंदी असतानाही वर्धा जिल्ह्यात माजी सैनिक वगळता मागील वर्षभरात तब्बल १ हजार ६९१ सर्वसामान्य नागरिकांना दारू पिण्याचा तसेच दारूसाठा बाळगण्याचा अधिकृत परवाना देण्यात आला आहे. ...
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा-तारासावंगा हा रस्ता पूर्ण उखडल्याने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच नियोजित ठिकाणी जावे लागत आहे. ...
पावसाळ्याच्या सुरूवातीला पालिकेच्यावतीने मोठा निधी खर्च करून शहरातील मोठे व मध्यम नाले स्वच्छ करण्यात येतात. परंतु, सध्या शहरातील विविध मंगल कार्यालयांमधील कचरा व उर्वरित अन्न थेट शहरातील मोकळ्या मैदानांसह मोठाल्या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याने हा ...
देशातील २२ राज्यांमधील १२८ गावांमध्ये १ ते १० जून या कालावधीत शेतकऱ्यांचा संप होणार आहे. या संपात महिला शेतकरी व युवकांचा सहभाग असायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ शेती तज्ज्ञ व महाराष्ट्र सुकाणू समितीचे सदस्य डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केली आहे. ...