१२ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यावरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जाणार आहे. खगोलप्रेमींनी ही अभूतपूर्व घटना पाहावी, असे आवाहन खगोल शास्त्रीय अभ्यासकांनी केले आहे. ...
राज्याच्या तिजोरीचा भार सांभाळणारे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वित्त नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन योजनेत यंदा ४८ कोटी रुपयांची कपात केली आहे. ...
महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे सामर्थ्य ओळखून सर्वांना समान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरला होता. संविधानानुसार शिक्षण विशेषत: उच्च शिक्षण हा आमचा हक्क आहे व तो देणे सरकारचे दायित्व आहे. ...
महात्मा गांधींनी दारुमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे ते स्वप्न साकार करण्यासोबतच त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवून विश्वात शांती निर्माण करण्यासाठी विश्वशांती पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा रविावारी सेवाग्राम आश्रमात नतमस्तक होऊन पुढील ...
आयुष्याला कलाटणी देणारी बारावी परीक्षा आता दहा दिवसांवर आली असून कनिष्ठ महाविद्यालयात सध्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र तयारी करीत आहेत. ...
वर्धेकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू आॅटोला समोरुन येणाºया कारने जबर धडक दिली. यात आॅटो चालक अनिल चलाख रा. वडगाव याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
जी माणसे जीवनात नियोजन करून जगतात, तीच यशस्वी होतात. नियोजनाशिवाय यश नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संबंध जीवनात नियोजनाला महत्त्व दिले. महाराजांचा मृत्यू वगळता साऱ्याच गोष्टींचे नियोजन त्यांनी केले. ...
तालुक्यातील धामणगाव (गाठे) गावालगत असलेल्या गोठ्यात बांधून आलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून दहा बकऱ्यांना गतप्राण केले. तर एका बकरी गंभीर जखमी केल्याने शेळी पालकाचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले आहे. ...
शहरात सध्या भूमिगत गटारवाहिनी टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे. असेच खोदकाम आर्वी मार्गावर केळकरवाडी परिसरात सुरू असताना अचानक जंक्शन जलवाहिनी फूटल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. ...
विद्युत प्रवाहित तारांमध्ये घर्षन होऊन आगीची ठिणगी ऊसावर पडली. बघता-बघता आगीने ऊसाला आपल्या कवेत घेतले. ही घटना नजीकच्या सुकटी (बाई) येथे घडली असून शेतकरी प्रभाकर गौळकर यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...