अहिंसेचा संदेश जगाला देणाऱ्या म.गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्धा शहरातील वंजारी चौकात एका तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्याची घटना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. ...
पुणे येथील मनादेव जाधव नामक व्यावसायिकाने एका कार्यक्रमात शिक्षकांना देशद्रोहीसारखे बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला. ...
नॅक मूल्यांकनाची पध्दती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच होय तेव्हा नॅक मूल्यांकन रूपी परीक्षेत शहाणपण, चतुरता व कल्पकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिध्दार्थ ...
नजीकच्या कोळोणा (चोरे) येथील बबन कडू यांच्या शेतातील हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीत कडू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. ...
शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली ...
काबाडकष्ट करून चणा पिकविला. मात्र, मागील आठवडाभरापासून भावात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना घरातच चण्याचे फुटाणे तर करावे लागणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
शहरात अन्य राज्यातील बोअरवेल दाखल होत आहेत. याशिवाय शहरात असलेल्या बोअरवेल व्यावसायिकांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अथवा नाही, याकरिता धडक तपासणी मोहीम राबविणार असून कारवाई करण्यात येईल. ...
शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...
येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील उपकुलगुरूंच्या दालनासमोर धरणे दिले. ...
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. ...