वर्ध्यात भररस्त्यात तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:56 AM2019-03-07T11:56:26+5:302019-03-07T11:56:55+5:30

अहिंसेचा संदेश जगाला देणाऱ्या म.गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्धा शहरातील वंजारी चौकात एका तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्याची घटना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.

The murder of the teenager in Wardha | वर्ध्यात भररस्त्यात तरुणाची हत्या

वर्ध्यात भररस्त्यात तरुणाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देजुन्या वादाचा काढला वचपा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: अहिंसेचा संदेश जगाला देणाऱ्या म.गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्धा शहरातील वंजारी चौकात एका तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्याची घटना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. या हल्ल्यात उमेश ठाकरे (२७) या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. हा जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी केलेला हल्ला होता असे सांगण्यात येते. हल्लेखोर मोटरसायकलवरून आले व हल्ला करून पसार झाले. मागील तीन दिवसांपासून वर्ध्यात घडलेली ही चौथी हत्या आहे, हे विशेष.

Web Title: The murder of the teenager in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून