शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका बिबटाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून अवैध शिकार प्रकाराचा तो बळी तर ठरला नाही ना ...
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे. ...
विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या जाते. या मोहिमेंंतर्गत एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत वर्धा शहरातील १३० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४९ लाख ८२ हजार ८५ रुपयाची वसुली करण्यात आली आहे. ...
समुद्रपूर- शेडगाव चौरस्ता सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास अडीच ते तीन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दारूबंदी पोलीस पथकाने सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत वाहनासह एकूण साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. ...
येथील बसस्थानक परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमणाने परिसीमा गाठली असतानाच आता गावातील गांधी वॉर्ड व नदी काठावरील रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. यामुळे मलातपूर, गौरखेडा शिवारात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. ...
तालुक्यातील भिडी येथे मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार माजी सरपंच गंभीर जखमी झाले. दिलीप बिल्डकॉनच्या चुकीमुळे महिन्याभरात दोन अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी दुपार ११ वाजता रास्तारोको केला.तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वर्धा- यवतमाळ ...
वाळूच्या दामदुप्पट दरामुळे वाळू घाटांच्या लिलावाकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आठ वाळूघाटांचा ई-लिलाव करण्यात आला. या लिलावातून शासनाच्या तिजोरीत ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५१ रुपयाचा महसूल जमा होणार आहे. ...
ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची कॉईल चोरण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांब्याची कॉईल चोरी करणाऱ्या टोळीच्या प्रमुखास बेड्या ठोे ...
जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र बुधवारी दुपारी स्पष्ट झाले. उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्याने उमेदवार आता प्रचाराच्या तयारीला लागले आहे. गुुरुवारपासून गावागावांत प्रचारतोफा धडकणार असल्याने नऊ दिवस-रात्र चालणाऱ्य ...