दोन दिवसांत साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:11 AM2019-03-15T00:11:13+5:302019-03-15T00:11:59+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दारूबंदी पोलीस पथकाने सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत वाहनासह एकूण साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.

Twenty-two lakhs of illicit liquor seized in two days | दोन दिवसांत साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त

दोन दिवसांत साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त

Next
ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर हिंगणघाट पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दारूबंदी पोलीस पथकाने सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत वाहनासह एकूण साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भाक्रा नाला नंदोरी मार्गावर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान कार क्रमांक एमएच ०२ बी. टी. ०१६२ मधून देशी दारूच्या बाटल्या असलेल्या ४० पेट्या जप्त केल्या. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. जप्त दारूसाठ्यासह मुद्देमालाची किंमत ४ लाख ९२ हजार रुपये आहे. याप्रकरणी सादिक फरीद शेख (२२) रा. तरोडा, पंकज दीपक काळे रा. फुले वॉर्ड या दोघांना अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत हिंगणघाट तालुक्यातील शेगाव (कुंड) येथील काळे यांच्या शेतातील बंड्यामधून विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. हा दारूसाठा ऋषभ सुशील काळे रा. फुले वॉर्ड याचा असल्याची माहिती माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी बंड्यामधून रॉयल स्टॅगच्या १४४ बाटल्या, डिप्लोमॅट कंपनीच्या १२० बाटल्या, ओसी ब्ल्यू कंपनीच्या ९६ बाटल्या, आयबी कंपनीच्या १२० मॅकडॉ, नं. ड च्या ९६ असा हकून १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाईत एकूण ३ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जी. एस. टेळे, हिंगणघाटचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात दारूबंदी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे, राजेंद्र हाडके, रामकिसन इप्पर, अभय वानखेडे, वीरेंद्र कांबळे, समीर गावंडे, सतीश नंदागवळी, रामदास चकोले, सचिन घेवंदे, गजानन जाचक आदींनी केली. सध्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. याकरिताच इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा आणण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Twenty-two lakhs of illicit liquor seized in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.