धोत्रा शिवारात रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून विश्राती घेत असलेल्या ट्रक चालक रमेशकुमार नरसिंग यादव याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ...
जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. अनेकांकडे सिंचनसुविधा उपलब्ध असली तरी उन्हामुळे पाणीपातळी खालावल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी भाजीपाला पीक कोमजत आहे. ...
पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही. ...
येथील मदनसिंग चव्हाण यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात गोठ्यातील शेत उपयोगी साहित्य व इतर साहित्य जळून कोळसा झाले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ...
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजबांधवांना दिली. याच महामानवाची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट १ मे १९३६ ला सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत झाली होती. ...
रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून वाहनाच्या कॅबीनमध्ये विश्राती घेत असलेल्या ट्रक चालकावर अज्ञात व्यक्तींनी चाकू हल्ला केला. यात ट्रकचालक रमेशकुमार नरसिंग यादव (३५) रा. रामभैरूली महाराज गंज उत्तरप्रदेश याचा मृत्यू झाला. ...
एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे. ...
तालुक्यात सरासरी ६५, तर शहरात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. मतदान करण्याकरिता पुरुषापेक्षा महिला मतदारांची जास्त गर्दी होती. एकूण १२ मतदान केंद्रावर १०९९३ पैकी ६८२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ...
शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘ल ...