राष्ट्रपती रामनाथ कोविद हे १७ ऑगस्ट रोजी सेवाग्राम येथे दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती २५ मिनिटे बापू कुटीत थांबणार आहेत. या दृष्टीकोनातून बापू कुटी व सेवाग्रामच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ...
'महापुराच्या विषयावरुन राष्ट्रवादीला राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. रिकामटेकडे निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून लोकांची मनं भडकावून सरकारविरोधात वातावरण तयार करायचं काम करत आहेत', असंही खोत म्हणाले. ...
सेलू तालुक्यात अवैध दारुविक्री व दारु निर्मितीचे काम चांगलेच वाढले होते. त्यामुळे सेलू पोलीसाच्या दारुबंदी पथकाने बुधवारी सकाळी जामनीच्या पारधी बेड्यावर वॉशआऊट मोहीम राबविली. या कारवाईत त्यांनी २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
गांधीजींची ओळख जगाला झाली होती. सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि सामुहिक जीवन पद्धतीमुळे सामान्य ते विद्वान सर्वच स्तरावरील लोकं बापूंकडे आकर्षित झाले होते. बापू १९१५ मध्ये भारतात आले आणि त्यांनी असंख्य युवा वर्गाच्या मनावर अधिराज्य केले. ...
आर्वी तालुक्यातील हरदोली, रसुलाबाद, पिंपळगाव, माळेगाव (ठेका) आदी शेतशिवारातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. ...
अनुदानाच्या मागणीसाठी राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीने ९ आॅगस्ट या क्रांतिदिनापासून शाळा कामकाज बंद आंदोलन पुकारले. मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. ...
यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड केली. कपाशीचे पीक जोमात बहरले. सततच्या पावसाने पिकासोबत तणही चांगलेच वाढले. शेतकऱ्यांनी गवत नष्ट करण्यासाठी कपाशी पिकात तणनाशक औषधीची फवारण ...
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा टाळता येईल, यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न होत असतानाच चक्क जि.प.च्या उपाध्यक्षांच्या शेतातील कपाशी पिकावरच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्येच खळबळ उडाली आहे. ...
शहरातील नांदगाव चौक भागातील सयाजीनगर येथील शिल्पी बॅनर्जी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. शिल्पी बॅनर्जी भवंस शाळेतील शिक्षिका आहे, हे विशेष. ...