जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी दक्षता म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन नागरिकांना केले जात आहे. परंतु, याच आवाहनाकडे ५४ व्यक्ती पाठ दाखवित असल ...
गत वर्षीच्या तुलनेत यंदा तूर पिकाचे पिकाचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी घटले आहे. तर गहू व चणा पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोरोनामुळे शेतीची कामे आणि जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता सर्वच काही टाळेबंद आहेत. पंतप्रधानांकडून ...
बँकेतील खातेधारकांकडून या आदेशाला हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र बँकेसमोर पहावयास मिळत आहे. सकाळी बँक उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लाबलचक रांगा पहावयास मिळत आहे. बँक व्यवस्थापनाकडून वारंवार सूचना देऊनही ग्राहक याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आरोग् ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर लढा देत आहे. जिल्ह्यात अद्यप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी बाहेरगावाहून येणाऱ्यांना शहरात बंदी आहे. पोहणा येथील वर्धा नदीच्या पुलावरून येवती, राळेगाव मार्गावरून यवतमाळ जिल्ह्यातील ...
दारूमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नसल्याने जिल्ह्यातील पोलीस दररोज वॉश आऊट मोहीम राबविताना दिसत आहे. पण, याच काळात मोठ्याप्रमाणात गावठी दारूअड्डे उद्धवस्त केल्या जात असल्याने यापूर्वी हे दारूअड्डे पोलिसांना दिसले नाही का, अशी चर्चाही ...
कोरोनामुळे वाया गेलेला हा काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुगीचा व लग्न सराईचा असतो. या काळात शेतकऱ्यांचे शेतीमाल तयार करुन विकणे व वर्षाचे आर्थिक नियोजन करणे हे असते. परंतु या परिस्थितीत शेतकरी बिकट प्रसंगामध्ये अडकला आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस, तुर अजू ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मद्यपींना शहरात दारूसाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील आरती चौक परिसरात राज्य उत्पादन शुल्काकडून जप्त करण्यात आलेली दारू ठेवण्यासाठी मालखाना आहे. मद्यपींनी त्या मालख ...
जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ३६३ व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आले आहेत. त्यांच्या तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ८८० व्यक्तांची १४ दिवसाचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला असून अद्याप २ हजार ४८३ जण होम क्वारंटाईनमध्ये ...
नागसेननगर परिसरातील नाल्याच्या लगत पोलिसांनी छापा मारला असता जमिनीत गाडून असलेल्या तीन ड्रममधील ३०० लिटर कच्चा मोहा सडवा रसायन, दारूभट्टीचे साहित्य असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. तर आनंदनगर, पुलफैल परिसरात छापा मारला असता दोन दारूभट्ट ...
शहरातील सेकंड होमसाठी ग्राहक पुढे यायला लागल्याने जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, सरकारच्या बदलत्या धोरणामुळे ग्राहकांकडून बुकिंग मिळत नसल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम रखडले गेले. त्यानंतर नोटाबंदी आणि जागत ...