प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधसाठा

By Admin | Updated: June 24, 2017 00:50 IST2017-06-24T00:49:47+5:302017-06-24T00:50:31+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदींने रुग्णांना मुदतबाह्य औषध देण्याचा प्रकार खुद्द आरोग्य सभापतींच्या

Out-of-date medicines in primary health center | प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधसाठा

प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधसाठा

आरोग्य सभापतींच्या भेटीत उघड : रुग्णालयाच्या आवारात रिकाम्या सिरींज
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदींने रुग्णांना मुदतबाह्य औषध देण्याचा प्रकार खुद्द आरोग्य सभापतींच्या भेटीत झडशी येथे गुरुवारी उघड झाला. यामुळे त्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांकडे सादर केला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट गुरुवारी सेलू तालुक्यातील झडशी येथे गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण होते. सभापती प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या असता त्यांना प्रसुतीगृहात मुदत संपलेला औषधसाठा असल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी येथे असलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना चांगलचे खडसावले. या औषधाचा वापर एखाद्या रुग्णावर झाला असता तर मोठी हानी झाली असती असे त्या म्हणाल्या.

दुर्लक्षामुळे गर्भवतींचे
आरोग्य धोक्यात
झडशी येथे कार्यरत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदीने येथे मे महिन्यात मुदत संपलेला औषधसाठा प्रसुती विभागात ठेवण्यात आला असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा वापर झाल्यास गर्भवती महिलेचे आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

Web Title: Out-of-date medicines in primary health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.