शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

वर्धा जिल्ह्यातील पाचोडमधील सेंद्रिय फळ, भाजीपाल्याला मुंबईकरांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 2:33 PM

Agriculture Wardha News वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.

ठळक मुद्देवाढीव दराने होतेय विक्री, गावातून ट्रक झाला रवाना

सचिन देवतळेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. पण, आता मॉल संस्कृतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने त्याचा फायदा होत आहे. नुकताच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या पाचोड येथील शेतकऱ्यांचा सेंद्रिय फळ व भाजीपाला थेट मुंबईत पोहोचला असून चांगला भावही मिळाला आहे.

आर्वी तालुक्याच्या विरुळ (आकाजी) नजीकच्या पाचोड येथील शेतकऱ्यांनी आकाजी महाराज शेतकरी प्रोड्युसर कंपनीअंतर्गत इको फार्म, यवतमाळ या संस्थेच्या तसेच आर्वी व कारंजा तालुक्यातील कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनअंतर्गत वाडी कार्यक्रम व नैसर्गिक शेती कार्यक्रम राबवून सेंद्रिय शेती केली. या शेतातून निघालेला आवळा, लिंबू, पपई व संत्री आदी फळे व भाजीपाला गावातून थेट मुंबईच्या मॉलमध्ये पाठविण्यात आला आहे. फळ व भाजीपाला भरलेला ट्रक मुंबईकडे रवाना करताना पाचोडचे सरपंच गजानन दोरजे, टेंभरी (परसोडी) येथील सरपंच सुरेखा पांढरे व गावातील शेतकरी उपस्थित होते.दारातून केली शेतमालाची उचलपाचोड येथील ५०० किलो आवळा, ५०० किलो लिंबू, ६५० किलो पपई व ६५० किलो संत्री आदी सेंद्रियशेतमालाची थेट दारातूनच उचल करण्यात आली. या शेतमालाचे क्लिनिंग व ग्रेडिंग करून मुंबईला पाठविण्यात आले. हे फळ व भाजीपाला इको फार्म संस्थेमार्फत शॉपिंग मॉलला पुरविला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खचार्ची बचत होऊन चांगला भाव मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेती