शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वक्तृत्व स्पर्धेत घडला ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’चा जागर

By admin | Updated: January 12, 2016 02:04 IST

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वर्धाच्या वतीने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे घेण्यात आली.

स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा : जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशनचा उपक्रमवर्धा : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वर्धाच्या वतीने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे घेण्यात आली. यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयीन गटामधून सागर कुबेटकर तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटामधून रश्मी खडीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हे दोन्ही स्पर्धक राज्यस्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) विवेक ईलमे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे तर प्रमुख अतिथी म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, नाट्य दिग्दर्शक हरिष इथापे, पंकज वंजारे, रत्नाकर सिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.पाणी गुणवत्ता व परिसर स्वच्छता या विषयामध्ये युवा वर्गाला सहभागी करून घेण्यासाठी व स्वच्छतेची व्याप्ती वाढवून युवा वर्गामध्ये पाणी गुणवत्ता व स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करून प्रत्येक महाविद्यालयामधून संदेश वाहक व अभ्यासू वक्ते तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यासाठी दरवर्षी शासनामार्फत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यात पाणी गुणवत्ता व स्वच्छतेबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम स्वच्छ भारत मिशनच्या वतीने राबविण्यात येतात. ही स्पर्धा सदर उपक्रमाचाच एक भाग आहे. महिन्याभरात तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधील दोन्ही गटामधून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे स्पर्धक जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरले. जिल्हास्तरावरून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना साधन व्यक्ती म्हणून मान्यता आहे. स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रम या कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार व क्षमता बांधणी यासारख्या उपक्रमामध्ये प्राधान्याने त्यांना साधन व्यक्ती म्हणून आमंत्रित करणार आहे.अत्ंयत चुरशीच्या झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी स्वच्छ निर्मल शाळा, बालकास लावी लळा, शुद्ध थेंब पाण्याचा लाभ आरोग्यदायी जीवनाचा, कचरा नव्हे कांचन, करा घनकचऱ्याचे व्यवस्थापन, मिळून साऱ्या जनी मिळवू स्वच्छ व शुद्ध पाणी, तरूणाईचे नवे धडे स्वच्छतेतून समृद्धीकडे, करू सांडपाण्याचे व्यवस्थापन धरतीचे होईल नंदनवन, करू तपासणी पाण्याची हमी आरोग्याची जीवनाची, यासह इतरही अनेक विषयावर स्पर्धकांनी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. स्पर्धेचे परीक्षण वंजारे, इथापे व रत्नाकर सिरसाट यांनी केले. संचालन माहिती, शिक्षण संवाद तज्ज्ञ विनोद खोब्रागडे यांनी केले. आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन सचिन खाडे व शालेय स्वच्छता तज्ज्ञ कैलास बाळबुधे यांनी मानले. स्पर्धेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी तज्ज्ञ कर्मचारी आणि यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.वरिष्ठ महाविद्यालयीन गटात द्वितीय क्रमांक शगुप्ता अ. हसन, तर तृतीय क्रमांक वृषाली वाघमारे व राणी भांगे यांना विभागून देण्यात आला. तसेच कनिष्ठ महाविद्यालय गटात द्वितीय क्रमांक चंचल वाधवान व प्रगती पिसुड्डे यांना तर तृतीय क्रमांक किरण कापडे व मोहन गाखरे या चौघांना विभागून देण्यात आला.(शहर प्रतिनिधी) वरिष्ठ गटातून सागर कुबेटकर तर कनिष्ठ गटातून रश्मी खडीकर अव्वल युवकांमध्ये स्वच्छता आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत जागृती वाढावी, त्यांनी स्वत: स्वच्छतेचा संदेश समाजात प्रषित करावा यासाठी म्हणून स्वच्छ भारत मोशन अंतर्गत हा स्पर्धात्मक उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून चांगले वक्तृत्वपटू तयार होत आहेत.