शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मेकॅनिकल शाखेत उज्ज्वल भविष्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:04 AM

अभियांत्रिकीच्या सर्व शाखामध्ये उत्तम भविष्य घडविता येते. कुठलेही शाखा कमी दर्जाची नाही. मात्र केवळ अभियंत्याची पदवी घेण्याचे ध्येय ठेवू नका. आपले शिक्षण सार्थकी झाले पाहिजे, असे उज्ज्वल भविष्य घडवा, असे प्रतिपादन केनिया येथे कार्यरत ग्रीनस्पॅन अग्रीटेक प्रा.लि.चे गोपाल शिंदे यांनी केले.

ठळक मुद्देगोपाल शिंदे : बा.दे. अभियांत्रिकीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अभियांत्रिकीच्या सर्व शाखामध्ये उत्तम भविष्य घडविता येते. कुठलेही शाखा कमी दर्जाची नाही. मात्र केवळ अभियंत्याची पदवी घेण्याचे ध्येय ठेवू नका. आपले शिक्षण सार्थकी झाले पाहिजे, असे उज्ज्वल भविष्य घडवा, असे प्रतिपादन केनिया येथे कार्यरत ग्रीनस्पॅन अग्रीटेक प्रा.लि.चे गोपाल शिंदे यांनी केले.सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. योगेश महंतारे, प्रा. जी.पी. ढलवार उपस्थित होते. मेकॅनिकल इंजिनिअरींग क्षेत्र व्यापक असून भविष्य घडविता येईल, अशा खूप संधी आहेत. केनिया येथील कंपनीची कार्यप्रणाली कशा पद्धतीने चालते. कशाप्रकारे तांत्रिक मनुष्यबळ हवे असते, असे विविध अनुभव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कुशल अभियंता होण्याचे ध्येय समोर ठेवून त्या दिशेने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असणे गरजेचे असते. तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलते आहे हा बदल विद्यार्थ्यांनी आत्मसात केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानात होत असलेले बदल अभ्यासून ज्ञान अद्यावत ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. महंतारे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींग मधील अद्यावत टेक्नॉलॉजीवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ढलवार यांनी केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :educationशैक्षणिक