शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकुळ; टायर पंक्चर करून दाम्पत्यास लुटले, दोन दिवसातली तिसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 17:09 IST

जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ५ एप्रिल रोजीही अशाचप्रकारे शेगाव येथून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या कारचे पंक्चर करून कारमधील लोकांना मारहाण करीत लुटण्यात आले.

ठळक मुद्देहिरडी शिवारातील घटना ६४,५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावला

समुद्रपूर (वर्धा) : नागपूर जिल्ह्यातील वणी येथे कारने जात असताना अज्ञात चार लुटारुंनी रस्त्यावर काहीतरी टाकून कारचे टायर पंक्चर केले. कार थांबताच चालकाला मारहाण केली. तसेच कारमधील दाम्पत्यास मारहाण करीत त्यांच्याजवळून दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ६४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला. ही घटना महामार्ग पोलीस चौकीच्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरडी शिवारात ७ तारखेला मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.

आकिब खान उस्मान खान पठाण रा. वणी हा कारमध्ये (एम.एच. २९ एडी. ५७०८) एका दाम्पत्याला बसवून वणी येथे गावी जात होता. दरम्यान, मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अचानक कारचे समोरचे टायर पंक्चर झाले. रस्त्याच्या कडेला कार थांबवून खाली उतरुन पाहणी करीत असतानाच अचानक कारजवळ चार अज्ञात व्यक्ती आल्या आणि चालक व दाम्पत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून रोख १६ हजार ५०० रुपये व पत्नीच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने, कानातील कर्णफुले, १२ ग्रॅमचे मंगळसूत्र असा एकूण ६४,५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेत पळ काढला.

यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या असल्याने घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी अरविंद येणोरकर व त्यांच्या टीमसह पथक रवाना केले. बोरखेडी टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून शोध कार्य सुरु केले आहे. पंकज मसराम यांनी श्वान पथक बोलावून ठसे तज्ज्ञांना पाचारण करुन चौकशीला सुरुवात केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता समुद्रपूर पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांनी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासासाठी मार्गदर्शन केले. पुढील तपास प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज मेश्राम, सूर्यवंशी, जितेंद्र वैद्य, राजू शेंडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीwardha-acवर्धाThiefचोरPoliceपोलिसRobberyचोरी