एक लाखाचा दारूसाठा जप्त

By Admin | Updated: September 11, 2014 23:44 IST2014-09-11T23:44:41+5:302014-09-11T23:44:41+5:30

स्टेशन फैल येथील दारूविक्रेता विजय इंगळे व त्याला दारू पोहोचवणारा गजानननगर येथील जादू उर्फ विशाल भगत या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. या कारवाईत दोघांजवळून एक

One lakh grams of sugarcane seized | एक लाखाचा दारूसाठा जप्त

एक लाखाचा दारूसाठा जप्त

वर्धा : स्टेशन फैल येथील दारूविक्रेता विजय इंगळे व त्याला दारू पोहोचवणारा गजानननगर येथील जादू उर्फ विशाल भगत या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. या कारवाईत दोघांजवळून एक लाख १३ हजार ५०० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशनफैल येथील विजय इंगळे हा दारू विकत असल्याच्या माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची घडती घेतली असता त्याच्याजवळ दारूचे दोन मोठे बंपर मिळून आले. यावरून त्याच्या घराची झडती घेतली असता घरातून दारूचा मोठा साठा मिळून आला. त्याची किंमत एक लाख १३ हजार ५०० रुपये आहे.
घरात सापडलेल्या दारूबाबत त्याला विचारणा केली असता त्याला ही दारू गजानननगर येथील विशाल भगत हा पोहोचवित असल्याचे त्याने सांगितले. यावरून विशाल यालाही अटक करण्यात आली आहे. या दोघांवर दारूबंदीच्या कलमान्वये शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह ठाणेदार एम. बुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बकाल, उपनिरीक्षक लिंगाडे, मुल्ला, सहायक उपनिरीक्षक अशोक साबले, राजू दहिलीकर, जमादार नामदेव किटे, विलास गमे, वैभव कट्टोजवार, संतोष जययस्वाल, हरिदास काकड व चालक आत्माराम भगत यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: One lakh grams of sugarcane seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.