दुचाकी अपघातात एक ठार; एक गंभीर
By Admin | Updated: August 8, 2015 02:17 IST2015-08-08T02:17:41+5:302015-08-08T02:17:41+5:30
यवतमाळ मार्गावरील सालोड (हिरापूर) परिसरात दोन भरधाव दुचाकीत धडक झाली.

दुचाकी अपघातात एक ठार; एक गंभीर
जखमीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू
वर्धा : यवतमाळ मार्गावरील सालोड (हिरापूर) परिसरात दोन भरधाव दुचाकीत धडक झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
उत्तम भाऊराव दिवटे (४४) रा. सालोड (हिरापूर) असे मृतकाचे नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतक परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत होता. यातील जखमीचे नाव कळू शकले नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ३२ एल ४११८ व एमएच ३२ जी ५२०१ या दोन दुचाकीत धडक झाली. यात उत्तम दिवटे हा गंभीर जखमी झाला. त्याला सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने जखमींची नावे कळली नाही.(प्रतिनिधी)