शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी अपघातात एक ठार, एक जखमी

By admin | Updated: July 5, 2014 23:43 IST

येथील विकास चौकात नागपूर-वर्धा महामार्गावर स्कुटीवरून जाणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकास कंटेनरने धडक दिली़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला़

सेलू : येथील विकास चौकात नागपूर-वर्धा महामार्गावर स्कुटीवरून जाणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकास कंटेनरने धडक दिली़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला़ दरम्यान, गर्दी झाल्याने ४़३० च्या सुमारास तेथेच दुसरा अपघात झाला़ यात मोटर सायकल चालक जखमी झाला़ या अपघातांमुळे संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करीत गतिरोधक बसविण्याची मागणी केली़मारोती पांडुरंग वैरागडे (५८) रा़ सेलू (ह़मु़ बेला) असे मृतकाचे नाव आहे़ त्यांच्या चुलत पुतणीचे लग्न होते़ यामुळे काही दिवसांपासून ते मुक्कामी होते़ शनिवारी नामदार नितीन गडकरी यांचा बसस्थानक परिसरात कार्यक्रम होता़ त्याच परिसरात एका दुकानात मित्राशी गप्पा झाल्यानंतर काही कामानिमित्त ते विकास चौकात गेले़ परत येत असताना नागपूरकडून येणाऱ्या डाक पार्सल कंटेनर क्ऱ एम़ एच़ ४० एक्स़ ३५५२ ने त्यांना मागाहून धडक दिली़ यात खाली पडलेल्या वैरागडे यांच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेले़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ मारोती वैरागडे हे लोकजीवन विद्यालय बेला येथून सेवानिवृत्त झाले होते़ त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे़ घटनास्थळावरून पसार झालेला अपघातग्रस्त ट्रक जुन्या एमएसईबी कार्यालयाजवळ नेऊन तेथून चालक, क्लिनर पसार झाले़ त्यांनी सेलू पोलीस ठाण्यात जाऊन संतप्त लोकांपासून वाचण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी कंटेनरमधील अरविंदकुमार दीपनारायण पासवान व शिवलखन पासवान रा़ गुमठी़ जि़ हजीपूर (बिहार) यांना ताब्यात घेतले़ अपघातस्थळी गर्दी झाल्याने दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्याच ठिकाणी प्रदीप ज्ञानेश्वर चापडे (५५) रा. जुनगड यांच्या मोटर सायकललाही अपघात झाला़ दोन्ही बाजूने आलेल्या वाहनांतून मार्ग काढताना त्याच्या मोटार सायकल क्र. एम़एच़ ३२ डी़ १५३९ ला धडक बसली़ यात त्यांचा पाय फॅक्चर झाला़ त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.एकाच दिवशी दोन अपघात झाल्याने संयम सुटलेल्या जमावाने वर्धा-नागपूर महामार्ग अडविला़ नारेबाजी करीत एक तास रस्ता रोखल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ नायब तहसीलदारांनी चार दिवसांत गतिरोधक बांधण्याबाबत संबंधित विभागाच्या सांगण्यावरून भाजपाचे वरुण दप्तरी यांना लेखी आश्वासन दिले़ यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले़(तालुका प्रतिनिधी)