शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

सात कारवाईत दीड लाखांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: December 11, 2014 23:12 IST

जिल्ह्यात दारूबंदीकरिता तयार केलेल्या विशेष पथकाने दोन दिवसात सात ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यात १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वर्धा : जिल्ह्यात दारूबंदीकरिता तयार केलेल्या विशेष पथकाने दोन दिवसात सात ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यात १ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदी (रेल्वे) परिसरातील परसोडी येथे केलेल्या कारवाईत १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. त्यांची नावे इक्बाल तझबीर अली, दिनेश वासुदेव नेवारे रा. सिंदी (रेल्वे), गजानन घुगरे, रवींंद्र हजारे रा. पवनार अशी असून इस्माईल रा. सिंदी (रेल्वे) हा फरार झाला. सिंदी (मेघे) येथील दारूविक्रेते नागपूर येथून बसने दारू आणत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या पथकाने पवनार येथील टी पॉर्इंटवर सापळा रचून माहिती असलेल्या बसची झडती घेतली असता त्यात सुभाष मोतीलाल कळसे रा. इंदिरानगर व अमोल रमेश दांडलेवार रा सिंदी (मेघे) या दोघांच्या हालचालीचा संशय आला. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत २८ हजार ८०० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इंझापूर येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी एम एच ३२ ई ५२१५ क्रमांकाच्या गाडीची झडती घेतली असता तिच्यावर गावठी दारूची वाहतूक करताना बेनिप्रसाद उर्फ विनोद द्वारकाप्रसाद जालान रा. इंझापूर याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राष्ट्रभाषा मार्गावर केलेल्या कारवाईत नानकराम संतानी याला अटक करून ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्धा शहरातील इंगोले चौक येथे केलेल्या कारवाईत सचिन उर्फ गोलू कोमजपिल्लेवार रा. केळकरवाडी व चेतन उर्फ चिंटू कानेटकर रा. गांधीनगर याला अटक करण्यात आली. या दोघांजवळून २३ हजार २०० रुपयांची दारू व एमएच ३२ डब्ल्यू ३२२० क्रमांकाची दुचाकी असा एकूण ९३ हजार २०० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. पवनार येथे केलेल्या कारवाईत अशोक आत्माराम काटोले व अर्जून सातघरे यांना अटक करून २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्धा शहरातील गणेशनगर येथे करण्यात आलेल्या कारवाईत शेख शकीर शेख खलिल रा. आनंद नगर याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने उपनिरीक्षक गजानन जाधव, एस. बी. मुल्ला, सहायक उपनिरीक्षक अशोक साबळे, हरिदास काकड, दिनेश तुमाने, वैभव कट्टोजवार, संतोष जयस्वाल, संजय भगत, अमरदिप पाटील, राजेश पचारे, आत्माराम भोयर, सुनिता ढाकरे यांनी केली.(प्रतिनिधी)