दीड लाखांचा दारूसाठा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:09+5:30

या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळापुर, लहादेवी जंगल शिवारात वॉश आऊट मोहीम राबविली. त्यावेळी त्यांना ठिकठिकाणी गावठी दारू गाळल्या जात असल्याचे निदर्शनास आले. अधिक माहिती घेतली असता सदर दारूभट्टी गौतम चंदनखेडे, नंदु मेश्राम, प्रकाश मेश्राम सर्व रा. सावळापुर यांची असल्याचे पुढे आले.

One and a half lakhs of alcohol was destroyed | दीड लाखांचा दारूसाठा नष्ट

दीड लाखांचा दारूसाठा नष्ट

वर्धा : सण-उत्सव व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे वॉश आऊट मोहीम राबवून गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेदरम्यान सदर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दारूविक्रेत्यांनी जमिनीत लपवून ठेवलेल्या मोह रसायन सडव्याचा शोध घेऊन तो नष्ट केला.
या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळापुर, लहादेवी जंगल शिवारात वॉश आऊट मोहीम राबविली. त्यावेळी त्यांना ठिकठिकाणी गावठी दारू गाळल्या जात असल्याचे निदर्शनास आले. अधिक माहिती घेतली असता सदर दारूभट्टी गौतम चंदनखेडे, नंदु मेश्राम, प्रकाश मेश्राम सर्व रा. सावळापुर यांची असल्याचे पुढे आले. या ठिकाणांवरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गावठी दारू, कच्चा मोह रसायन सडवा व दारू गाठण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक ढोले, स. फौ. बावणे, राऊत, जुवारे, निघोट कोकोडे, ताकसांडे, मळनकार, भोमले, कुंभरे, आलवडकर, गोटेफोडे, सानप तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक देवणे, पोलीस उपनिरिक्षक किमुकले आदींनी केली. सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध आर्वी पोलीस ठाण्यात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One and a half lakhs of alcohol was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.